Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia Motors कडून ‘या’ खास Next-Gen कारची तयारी सुरु, केव्हापर्यंत होईल भारतात सादर?

किआ मोटर्सच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. आता लवकरच कंपनी त्यांच्या एका लोकप्रिय कारच्या नेक्स्ट जनरेशनवर काम करत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 12, 2026 | 04:53 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Kia Sonet च्या नेक्स्ट जनरेशनची तयारी सुरु
  • मिळणार एकापेक्षा एक उत्तम फीचर्स
  • भारतात 2027 पर्यंत लाँच होण्याची शक्यता
भारतीय वाहन बाजारात आपल्याला अनेक विदेशी ऑटो कंपन्या सुद्धा पाहायला मिळतात, ज्या ग्राहकांच्या डिमांडनुसार बेस्ट कार ऑफर करत असतात. अशीच एक आघाडीची वाहन उत्पादक कंपनी म्हणजे Kia.

किआने भारतीय वाहन बाजारात विविध सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री केली आहे. कंपनी कडून ‘कॉम्पॅक्ट SUV’ सेगमेंटमध्ये Kia Sonet हे मॉडेल उपलब्ध करून दिले जाते. प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार, कंपनी या SUV चे नवीन जनरेशन मॉडेल बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या मॉडेलमध्ये कोणत्या प्रकारचे बदल अपेक्षित आहेत? तसेच, हे मॉडेल भारतात नक्की कधीपर्यंत लाँच केले जाण्याची शक्यता आहे? या सर्व तपशीलांचा आढावा आपण या बातमीतून घेऊयात.

50 हजारांच्या पगारावर Tata Sierra खरेदी करण्याचे स्वप्न दणक्यात पूर्ण होईल! EMI फक्त 18000 रुपये आणि डाउन पेमेंट…

‘किया’कडून नवीन पिढीच्या मॉडेलची तयारी सुरू

प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार, ‘किआ’ने आपली कॉम्पॅक्ट SUV असलेल्या ‘किया सोनेट’च्या नवीन जनरेशनचे मॉडेल भारतात लाँच करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, या घडामोडीबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

काय असतील बदल?

सध्याच्या सोनेटच्या तुलनेत नव्या जनरेशनमध्ये अनेक मोठे बदल अपेक्षित आहेत. ही SUV किआच्या Syros प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते, ज्यामुळे सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक प्रशस्त केबिन मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, नव्या फीचर्सची भर घालण्यात येऊ शकते आणि Level-2 ADAS सारखी प्रगत सेफ्टी फीचर्सही देण्यात येण्याची शक्यता आहे.

‘ही’ कंपनी काय ऐकत नाही बाबा! पहिल्या 3 महिन्यांत 54 नवीन सेंटर्स सुरू; विक्रीतही 98 टक्क्यांची विक्रमी वाढ

किती दमदार असेल इंजिन?

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या जनरेशनमध्ये मुख्यतः डिझाइन आणि फीचर्समध्ये बदल होण्याची शक्यता आहे. इंजिन मात्र सध्याच्या मॉडेलप्रमाणेच ठेवले जाऊ शकते. यात 1.2 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बो डिझेल इंजिनचे पर्याय मिळू शकतात. यासोबत मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्यायही उपलब्ध असतील.

कधी होणार लाँच?

कंपनीकडून अद्याप अधिकृतपणे लाँचबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, अंदाजानुसार ही SUV भारतात 2027 च्या सुरुवातीला लॉन्च होऊ शकते.

कोणाशी असेल स्पर्धा?

किआ सोनेट ही कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये येते. या सेगमेंटमध्ये तिचा थेट सामना Maruti Brezza, Hyundai Venue, Kia Syros, Nissan Magnite, Skoda Kylaq आणि Mahindra XUV 3XO यांसारख्या SUV सोबत होतो.

Web Title: Kia sonet next generation may lauched in 2027 in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • automobile
  • Kia Motors

संबंधित बातम्या

गाडी चालवताना बॅटरी नेमकी कशी चार्ज होते? जाणून घ्या सोप्या भाषेत
1

गाडी चालवताना बॅटरी नेमकी कशी चार्ज होते? जाणून घ्या सोप्या भाषेत

पावसाळ्यात कार आणि बाईकचे ब्रेक्स सुरक्षित ठेवण्याच्या ५ सोप्या टिप्स! जाणून घ्या
2

पावसाळ्यात कार आणि बाईकचे ब्रेक्स सुरक्षित ठेवण्याच्या ५ सोप्या टिप्स! जाणून घ्या

कारच्या क्रॅश टेस्ट मध्ये कोणकोणत्या गोष्टींची चाचणी केली जाते? जाणून घ्या क्रॅश टेस्टची A टू Z माहिती
3

कारच्या क्रॅश टेस्ट मध्ये कोणकोणत्या गोष्टींची चाचणी केली जाते? जाणून घ्या क्रॅश टेस्टची A टू Z माहिती

कारवर डेंट पडलाय? जाणून घ्या घरच्या घरी कारचे लहान डेंट दुरुस्त करण्याचे  घरगुती, सोपे आणि सुरक्षित उपाय
4

कारवर डेंट पडलाय? जाणून घ्या घरच्या घरी कारचे लहान डेंट दुरुस्त करण्याचे  घरगुती, सोपे आणि सुरक्षित उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.