Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किया सोरेंटो हायब्रिड SUV लवकरच भारतात होणार लाँच! जाणून घ्या सर्व महत्त्वाची माहिती

किया इंडियाने आपल्या नव्या प्रीमियम 'सोरेंटो' हायब्रिड SUV च्या लाँचिंगचे संकेत दिले असून, पुढील काही आठवड्यांत ही कार भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. १.६-लीटर टर्बो पेट्रोल हायब्रिड इंजिन, ५ ते ७ सीटर पर्याय आणि लेव्हल-२ ADAS सह येणारी ही फ्लॅगशिप कार स्कोडा कोडियाक आणि फॉक्सवॅगन टायरोनला टक्कर देईल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 30, 2026 | 02:50 PM
किया सोरेंटो हायब्रिड SUV लवकरच भारतात होणार लाँच! जाणून घ्या सर्व महत्त्वाची माहिती
Follow Us
Follow Us:
  • किया इंडियाने इटलीच्या ‘सोरेन्टो’ शहराचा टीझर शेअर करत येणाऱ्या फ्लॅगशिप SUV च्या नावाची घोषणा केली आहे.
  • या गाडीत १.६L टर्बो पेट्रोल हायब्रिड इंजिनसह ५, ६ आणि ७-सीटर लेआउट पर्याय मिळतील.
  • भारतात ही प्रीमियम कार असेंबल करून लाँच केली जाईल आणि स्कोडा कोडियाकशी थेट स्पर्धा करेल.

किया इंडियाने आपल्या नव्या फ्लॅगशिप SUV ‘किया सोरेंटो’च्या भारतातील आगमनाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. कंपनीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका टीझरमध्ये इटलीच्या ‘सोरेन्टो’ शहराची झलक दाखवली आहे, ज्यामुळे हे आगामी मॉडेल सोरेंटोच असेल यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही अधिकृत डीलरशिप्सवर या गाडीची अनधिकृत बुकिंगही सुरू झाली असून, पुढील काही आठवड्यांत ही कार अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता आहे.

पावरफुल हायब्रिड इंजिन आणि परफॉर्मन्स

भारतीय बाजारात ही SUV कियाची फ्लॅगशिप ICE इंटरनल कम्बशन इंजिन SUV म्हणून ओळखली जाईल. यात स्ट्रॉंग हायब्रिड पेट्रोल इंजिन मिळण्याची दाट शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या गाडीमध्ये १.६-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल हायब्रिड इंजिन दिले जाते, जे २३८ hp ची कमाल पॉवर आणि ३८० Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. जागतिक स्तरावर ही गाडी फ्रंट-व्हील-ड्राइव्ह आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, मात्र भारतात कोणता पर्याय दिला जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Ford Explorer आणि Lincoln Aviator ड्रायव्हर सीटमध्ये तांत्रिक बिघाड! कंपनीकडून हजारो गाड्या मागे मागवल्या!

पाच सहा आणि सात सीटरचे पर्याय

किया सोरेंटोचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे केबिन आणि सीटींग लेआउट. ही प्रीमियम SUV ५-सीटर, ६-सीटर आणि ७-सीटर अशा तीन वेगवेगळ्या सीटींग पर्यायांमध्ये सादर केली जाऊ शकते. जर असे झाले, तर आपल्या सेगमेंटमध्ये तीनही सीटींग पर्याय देणारी ही एकमेव SUV ठरेल.

आकार आणि डिझाइन

ही SUV गेल्या काही महिन्यांपासून भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान अनेकदा दिसून आली आहे.

  • लांबी: ४,८१५ मिमी
  • रुंदी: १,९०० मिमी
  • उंची: १,७०० मिमी
  • व्हीलबेस: २,८१५ मिमी
गाडीच्या बाहेरील डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, यात कियाची सिग्नेचर ‘टायगर नोज’ ग्रिल, व्हर्टिकल एलईडी लाईट्स, रूफ रेल्स, क्रोम विंडो सराउंड आणि १९-इंचाचे ड्युअल-टोन अलॉय व्हील्स मिळतात.

१९८० च्या दशकातील ‘या’ ५ भन्नाट कॉन्सेप्ट कार्स; ज्या रस्त्यावर उतरल्या असत्या तर इतिहास घडला असता!

हाय-टेक केबिन आणि फीचर्स

इंटरनॅशनल मॉडेलप्रमाणेच भारतीय मॉडेलमध्येही अनेक प्रीमियम फीचर्स पाहायला मिळतील:

  • ड्युअल स्क्रीन सेटअप: १२.३-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि १२.३-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम.
  • आरामदायी फीचर्स: पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॉवर्ड ड्रायव्हर सीट.
  • सुरक्षा: ३६०-डिग्री कॅमेरा, वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि लेव्हल-२ ADAS (अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) तंत्रज्ञान.
भारतात कोणाशी होणार स्पर्धा?

किया सोरेंटो ही गाडी भारतात CKD (Completely Knocked Down) म्हणजेच असेंबल करून विक्रीसाठी आणली जाण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात लाँच झाल्यानंतर या कारची थेट स्पर्धा स्कोडा कोडियाक आणि फॉक्सवॅगन टायरोन यांसारख्या प्रीमियम SUVs शी होईल.

Web Title: Kia sorento hybrid suv launch soon in india key details auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

ऑगस्टच्या महिन्यात स्कूटर विक्रीचा मोठा विक्रम! 8.55 लाखांहून जास्त युनिट्सची केली डिलिव्हरी
1

ऑगस्टच्या महिन्यात स्कूटर विक्रीचा मोठा विक्रम! 8.55 लाखांहून जास्त युनिट्सची केली डिलिव्हरी

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा
2

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी
3

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी

Volvo XC60 आणि XC90 Long-Range PHEV लाँच; मिळणार तब्बल 200 किमी इलेक्ट्रिक रेंज
4

Volvo XC60 आणि XC90 Long-Range PHEV लाँच; मिळणार तब्बल 200 किमी इलेक्ट्रिक रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.