Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा

भारतातील इलेक्ट्रिक गतीशीलता क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यामध्‍ये कंपन्‍या एल५ व एल३ ई३डब्‍ल्‍यू श्रेणीसाठी देशातील सर्वात गतीशील चार्जिंग सोल्‍यूशन सादर करत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 18, 2025 | 06:21 PM
कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग (Photo Credit - X)

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

  • L5 आणि L3 श्रेणीतील ई-वाहनांसाठी ‘रॅपिड चार्जिंग’ तंत्रज्ञान
  • ई-रिक्षा चालकांना मिळेल ३०% जास्त अपटाइम
  • कमाईत वाढ होणार
भारत, नोव्‍हेंबर १८, २०२५: कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्‍यूशन्‍स लिमिटेड या भारतातील इलेक्ट्रिक तीनचाकी (ई३डब्‍ल्‍यू) आणि इलेक्ट्रिक दुचाकी (ई२डब्‍ल्‍यू)च्‍या आघाडीच्‍या उत्‍पादक कंपनीने आज रॅपिड चार्जिंग तंत्रज्ञानाची अग्रणी कंपनी एक्‍स्‍पोनण्‍ट एनर्जीसोबत धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा केली. भारतातील इलेक्ट्रिक गतीशीलता क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यामध्‍ये कंपन्‍या एल५ व एल३ ई३डब्‍ल्‍यू श्रेणीसाठी देशातील सर्वात गतीशील चार्जिंग सोल्‍यूशन सादर करत आहे. एल५ व एल३ ई३ डब्‍ल्‍यू देशातील सर्वात मोठी, झपाट्याने विकसित होणारी आणि सर्वाधि‍क वापरली जाणारी श्रेणी आहे, ज्‍यामध्‍ये ई-रिक्षा व ई-कार्गो कार्टसचा समावेश आहे. हे एकीकरण भारतातील शहरी व अर्ध-शहरी भागांमधील लास्‍ट माइल मोबिलिटी ऑपरेटर्ससाठी ऑपरेशनल कार्यक्षमता व उत्‍पादकतेला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याची खात्री देते.

या सहयोगांतर्गत कायनेटिक ग्रीनचे लोकप्रिय एल३ मॉडेल्‍स जसे, सेफर स्‍मार्ट, सेफर शक्‍ती आणि सुपर डीएक्‍स या इलेक्ट्रिक वेईकल्‍समध्‍ये आता १५-मिनिट रॅपिड चार्जिंग तंत्रज्ञान आहे, जे लहान ब्रेक्‍सदरम्‍यान जलद चार्जिंग देते आणि दैनंदिन ऑपरेटिंग तास जवळपास ३० टक्‍क्‍यांनी वाढवते.

एल५ श्रेणीमधील अपवादात्‍मक पेलोड व रेंजसाठी ओळखली जाणारी हाय-स्‍पीड परफॉ‍र्मन्‍स लॉजिस्टिक्‍स वेईकल एल५एन सेफर जम्‍बो लोडर १५-‍मिनिट चार्जिंगच्‍या माध्‍यमातून जलद टर्नअराऊंड वेळ देते, ज्‍यासह व्‍यक्‍ती व मालक-ऑपरेटर्स आणि ताफा ऑपरेटर्सना अधिक ट्रिप्‍स, अधिक कमाई आणि वाढीव परताव्‍यांची खात्री मिळते. तसेच, जवळपास ५० किमी/तास गतीची क्षमता असलेली आणि आंतरशहरीय लांब अंतरासाठी डिझाइन करण्‍यात आलेली आगामी एल५एम पॅसेंजर व्‍हेरिएण्‍टमध्‍ये देखील हे प्रगत चार्जिंग तंत्रज्ञान असेल, ज्‍यासह दैनंदिन वापर वाढेल.

FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम

अत्‍याधुनिक बॅटरी तंत्रज्ञान, स्‍मार्ट चार्जिंग नेटवर्क आणि इंटेलिजण्‍ट सॉफ्टवेअर असलेला एक्‍स्‍पोनण्ट एनर्जीचा मालकीहक्‍काचा फूल-स्‍टॅक प्‍लॅटफॉर्म १५-मिनिट रॅपिड चार्जिंग व मालमत्तेचे आजीवन मूल्‍य वाढवणा-या उद्योगामधील अग्रणी ३०००-सायकल वॉरंटीसह कायनेटिक ग्रीनला सक्षम करते. हे संयुक्‍त सोल्‍यूशन एक्‍स्‍पोनण्‍टच्‍या वाढत्‍या चार्जिंग नेटवर्कमध्‍ये विनासायास चार्जिंगसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, तर एकीकृत डिजिटल प्‍लॅटफॉर्म प्रत्‍यक्ष चार्ज ट्रॅकिंगची स्थिती, अंदाजित मेन्‍टेनन्‍स अलर्टस् आणि फ्लीट ऑप्टिमायझेशनसाठी डेटा विश्‍लेषण देतो.

या घोषणेबाबत मत व्‍यक्‍त करत कायनेटिक ग्रीनच्‍या संस्‍थापिका व मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुलज्‍जा फिरोदिया मोटवानी म्‍हणाल्‍या, ”हा सहयोग भारतातील इलेक्ट्रिक तीन-चाकी क्षेत्रासाठी महत्त्‍वपूर्ण क्षण आहे. भारतातील शहरी लास्‍ट माइल मोबिलिटीचे आधारस्‍तंभ ई-रिक्षा व कार्गो कार्टसमध्‍ये देशातील पहिल्‍या १५-मिनिट फूल चार्ज सोल्‍यूशनची भर करत आम्‍ही मालक ऑपरेटर्स, लहान व मोठ्या फ्लीट ऑपरेटर्सना अनपेक्षित अपटाइम आणि कार्यक्षमता संपादित करण्‍यास सक्षम करत आहोत. आमच्‍या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाने ग्राहकांना सर्वोत्तम मालकीहक्‍क खर्च देण्‍याकरिता आमच्‍या एल३ ई३ डब्‍ल्‍यू श्रेणीसाठी या विशेष धोरणात्‍मक सहयोगाला चालना दिली. हा सहयोग हरित गतीशीलतेचे लोकशाहीकरण करण्‍याप्रती, शाश्वत परिवहन सर्वांसाठी सहजसाध्‍य व किफायतशीर करण्‍याप्रती, तसेच भारतातील ईव्‍ही पायाभूत सुविधेच्‍या विकासाला गती देण्‍याप्रती आमच्‍या मिशनला चालना देतो.”

एक्‍स्‍पोनण्‍ट एनर्जीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक श्री. अरूण विनायक म्‍हणाले, ”एक्‍स्‍पोनण्‍ट एनर्जीमध्‍ये आमचे ईव्‍हींना सोपे पर्याय करण्‍याचे, म्‍हणजेच वास्‍तविक ऑपरेटर्ससाठी वास्‍तविक समस्‍यांचे निराकरण करण्‍याचे मिशन आहे. हा सहयोग आम्‍हाला आमचा रॅपिड चार्जिंग प्‍लॅटफॉर्म भारतातील ई३डब्‍ल्‍यूच्‍या संपूर्ण पोर्टफोलिओमध्‍ये समाविष्‍ट करण्‍याची सुविधा देतो, ज्‍यामध्‍ये एल५ व एल३ श्रेणी आहेत. यासह ऑपरेटर्सना अद्वितीय गती, विश्वसनीयता व सर्वोत्तम सुविधा मिळतात आणि इलेक्ट्रिक परिवहनाच्‍या भविष्‍यासाठी ब्‍लूप्रिंट तयार होते.”

त्‍वरित कायनेटिक ग्रीन ग्राहकांना पाठिंबा देण्‍यासाठी एक्‍स्‍पोनण्‍ट एनर्जीचे चार शहरांमधील १६० हून अधिक चार्जिंग स्‍टेशन्‍सचे नेटवर्क ई३डब्‍ल्‍यू ताफ्यासाठी उपलब्‍ध करून देण्‍यात येईल. पुढील १२ महिन्‍यांमध्‍ये या पायाभूत सुविधा झपाट्याने प्रमुख मेटो आणि द्वितीय / तृतीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये विस्‍तारित होतील. एक्‍स्‍पोनण्‍टचे क्‍लाऊड-आधारित चार्जिंग डॅशबोर्ड देखील कायनेटिक ग्रीनच्‍या ताफा व्‍यवस्‍थापन अॅपमध्‍ये एकीकृत करण्‍यात येईल, ज्‍यासह ऑपरेटर्स शुल्‍क निर्धारित करण्‍यास, मार्ग सानुकूल करण्‍यास आणि सहजपणे वेईकल अपटाइम वाढवण्‍यास सक्षम होतील.

या सहयोगाचा गतीशील चार्जिंग एकीकृत ई३डब्‍ल्‍यू सोल्‍यूशन्‍समध्‍ये कायनेटिक ग्रीनच्‍या नेतृत्‍वाला गती देण्‍याचा मनसुबा आहे, तसेच एल३ श्रेणीमध्‍ये उच्‍च विकासावर आणि भारतातील ई३डब्‍ल्‍यू क्षेत्रातील अग्रणी कंपनी म्‍हणून कायनेटिक ग्रीनचे स्‍थान स्‍थापित करण्‍यावर विशेष लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे.

High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स

Web Title: Kinetic green and exponent energy collaborate now the fastest e rickshaw that can be fully charged in 15 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 06:05 PM

Topics:  

  • automobile
  • automobile news
  • Electric Vehicle

संबंधित बातम्या

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI
1

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन
2

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन

7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा
3

7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा

जास्त पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा! KTM च्या ”या’ बाईक्स झाल्या 27,000 रुपयांनी महाग
4

जास्त पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा! KTM च्या ”या’ बाईक्स झाल्या 27,000 रुपयांनी महाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.