Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त एका बटणाचा खेळ आणि कार होईल AirCar ! किंमत वाचताच फुटेल घाम

एकीकडे आधुनिक कार लाँच होत असतानाच आता जागतिक मार्केटमध्ये हवेत उडणारी कार दाखल होणार असल्याचे बोलले जात होते. चला या AirCar बद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: May 13, 2025 | 08:03 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

बदलत्या काळानुसार ऑटोमोबाईल मार्केटमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. पूर्वी मुख्यत्वे इंधनावर चालणाऱ्या कार्सचेच उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असे. मात्र आता पर्यावरणपूरक पर्यायांचा विचार केला जात असून इलेक्ट्रिक वाहने (EVs) झपाट्याने लोकप्रिय होत आहेत. यासोबतच हायड्रोजनवर चालणाऱ्या कार्सही बाजारात दाखल होत आहेत. या सर्व नवकल्पनांमध्ये ‘एअरकार’ म्हणजेच हवेत उडणाऱ्या कार्सची एक वेगळीच क्रेझ निर्माण होत आहे. भविष्यात वाहतुकीचे स्वरूपच बदलणार असल्याचे संकेत यातून मिळतात.

अनेकदा अ‍ॅक्शन चित्रपटांमधून आपण हवेत झेप घेणाऱ्या कार पहिल्याच असतील. यामुळे सातत्याने लोकांमध्ये हवेत उडणाऱ्या कारची क्रेझ वाढत आहे. हेच कारण आहे की अनेक ऑटोमोबाईल कंपन्या सतत फ्लाईंग कारवर काम करत आहेत. या संदर्भात, स्लोवाकियन स्टार्टअप क्लेन व्हिजनने त्यांच्या पहिल्या फ्लाइंग कारचे प्रोडक्शन रेडी प्रोटोटाइप सादर केला आहे. याबद्दल, कंपनीने म्हटले आहे की ही उडणारी कार पुढील वर्षी बाजारात आणली जाईल.

MG Windsor Pro Vs Tata Curvv EV: फीचर्स, बॅटरी आणि रेंजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

क्लेन व्हिजनबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 30 वर्षांपासून या एअर कारवर काम करत आहे. प्रोडक्शन रेडी मॉडेलपर्यंत, या कारने 170 हून अधिक उड्डाण तास आणि 500 हून अधिक टेकऑफ आणि लँडिंग पूर्ण केले आहे. 2022 मध्ये, या एअरकार मॉडेलला फ्लाइंग सर्टिफिकेट देण्यात आले आहे.

किती असेल एअरकारची किंमत?

क्लेन व्हिजनची एअरकार पुढील वर्षी बाजारात येईल. कंपनीच्या प्रवक्त्यानुसार, पुढील वर्षी लाँच होणाऱ्या या एअरकारची किंमत 8 ते 10 लाख अमेरिकन डॉलर्स असेल. जर आपण भारतीय चलनात बोललो तर ही किंमत अंदाजे 6.78 कोटी ते 8.47 कोटी रुपये असेल.

काही क्षणात एअरकारमध्ये रूपांतर

या एअरकारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही एक कन्वर्टिबल कार आहे, जी सामान्य वाहनाप्रमाणे रस्त्यावर सहज चालवता येते. यासोबतच, गरज पडल्यास, ही कार उडत्या विमानात देखील रूपांतरित केली जाऊ शकते. कारपासून ते एअरक्राफ्टमध्ये रूपांतरित होण्यासाठी फक्त 2 मिनिटांचा वेळ लागतो.

भारतीय बाजारात ‘या’ बाईक्सचा दरारा; तुमच्या Bike कलेक्शनमध्ये करा Add, वाढेल दरारा

क्लेन व्हिजन एअरकारचा वेग किती आहे?

एअरकारचे संपूर्ण सिस्टम आपोआप काम करते. या एअरकारबद्दल कंपनीचे म्हणणे आहे की क्लेन व्हिजन एअरकारचा लेस्टस्ट व्हेरियंट रस्त्यावर 200 किमी प्रतितास आणि हवेत 250 किमी प्रतितास वेगाने उडू शकतो.

Web Title: Klein vision aircar will be launched in the next year 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 08:30 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • new car

संबंधित बातम्या

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
1

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
4

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.