फोटो सौजन्य - Social Media
भारतीय बाजारात बजेटमध्ये उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक्सची मोठी मागणी असते. अनेक तरुण आणि बाइकप्रेमी अशा मोटरसायकलींचा शोध घेत असतात ज्या डेली युजसाठी योग्य असाव्यात आणि वीकेंडला लॉन्ग राईडचा आनंद देऊ शकाव्यात. जर तुमचे बजेट 2 लाख रुपयांपर्यंत आहे, तर येथे अशा तीन बाईक्सबद्दल माहिती दिली आहे ज्या परफॉर्मन्स, फीचर्स आणि स्टाईलच्या बाबतीत उत्कृष्ट पर्याय ठरू शकतात.
Yamaha R15 V4
स्पोर्टी लूकसाठी प्रसिद्ध असलेली Yamaha R15 V4 ही बाईक 1.84 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरात उपलब्ध आहे. हिला 155cc लिक्विड-कूल्ड इंजिन असून हे इंजिन 18.1 bhp पॉवर आणि 14.2 Nm टॉर्क निर्माण करते. अॅग्रेसिव्ह डिझाइन, व्हेरिएबल वॉल्व अॅक्ट्युएशन (VVA), स्लिपर क्लच आणि डिजिटल कन्सोलसारखी फीचर्स यामध्ये मिळतात. ही बाईक स्पोर्टी रायडिंग अनुभव देण्यासाठी आदर्श आहे.
TVS Apache RTR 200 4V
TVS कंपनीची Apache RTR 200 4V ही बाईक 1.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरात मिळते. हिच्यात 197.75cc क्षमतेचे एअर आणि ऑईल-कूल्ड इंजिन आहे, जे 20.54 bhp पॉवर आणि 17.25 Nm टॉर्क तयार करते. यात तीन राइडिंग मोड्स (स्पोर्ट, अर्बन आणि रेन), एडजस्टेबल फ्रंट-रिअर सस्पेंशन, ड्युअल-चॅनल ABS आणि अॅडव्हान्स ब्रेकिंग टेक्नोलॉजीसारखी फीचर्स दिली आहेत. ही बाईक शहरात आणि हायवेवर दोन्ही ठिकाणी चांगला परफॉर्मन्स देते.
Bajaj Pulsar NS400Z
बजाजच्या नव्या लाईनअपमधील Pulsar NS400Z बाईक 1.85 लाख रुपये (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध आहे. ही बाईक 373cc लिक्विड-कूल्ड इंजिनसह येते जे 40 bhp पॉवर आणि 35 Nm टॉर्क निर्माण करते. यात ऑल एलईडी लाइटिंग, LCD डिस्प्ले, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल आणि चार राइडिंग मोड्स मिळतात. ही बाईक परफॉर्मन्स प्रेमींसाठी योग्य ठरते.
ही तिन्ही बाईक्स त्या राइडर्ससाठी खास आहेत जे कमी बजेटमध्ये आधुनिक फीचर्स आणि दमदार पॉवर शोधत आहेत. डेली कम्युटपासून स्पोर्टी राइडपर्यंत यांचा वापर करता येतो.