MG Windsor Pro Vs Tata Curvv EV: फीचर्स, बॅटरी आणि रेंजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?
मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री देखील झपाट्याने वाढत आहे. ग्राहक देखील आता इंधनावर चालणाऱ्या कारपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहेत. यामुळे भारतीय मार्केटमध्ये काही अशा देखील इलेक्ट्रिक कार्स आहेत, ज्या लोकप्रिय ठरल्या आहेत. MG Windosr EV ही त्यातीलच एक कार. आता एमजी मोटर्सने देशात Windsor Pro EV लाँच केली आहे.
Windsor Pro EV ची थेट स्पर्धा Tata Curvv EV सोबत आहे. म्हणूनच आज आपण एमजी विंडसर प्रो ईव्ही आणि टाटा कर्व्ह ईव्हीमधील कोणती कार जबरदस्त आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.
2 लाखात ‘ही’ Electric Car होईल तुमची, फक्त लक्षात असू द्या EMI चा फंडा
एमजी विंडसर प्रो ईव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. यात ड्युअल टोन इंटीरियर, V2L आणि V2V देखील आहेत. याशिवाय, त्यात अँबियंट लाईट, इन्फिनिटी ग्लास रूफ, फ्रंट सीट व्हेंटिलेशन, 15.6 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, अॅपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, चार स्पीकर्स, चार ट्विटर, सब वूफर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, लाकडी फिनिश, 604 लिटर बूट स्पेस, एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेल लाईट्स, कनेक्टेड डीआरएल, पॉवर्ड टेलगेट, 18 इंच अलॉय व्हील्स, ग्लास अँटेना, फ्लश डोअर हँडल अशी फीचर्स आहेत.
दुसरीकडे, Tata Curvv EV मध्ये शार्क फिन अँटेना, बॉडी कलर बंपर, LED DRL, LED हेडलाइट, पॅनोरॅमिक सनरूफ, 17 इंच अलॉय व्हील्स, पियानो ब्लॅक इंटीरियर, 26.03 सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, एअर प्युरिफायर, ऑटो हेडलॅम्प, क्रूझ कंट्रोल, फॉलो मी हेडलॅम्प, पॉवर विंडो, रेन सेन्सिंग वायपर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, अॅपल कार प्ले, 12.3 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम अशी फीचर्स आहेत.
JSW MG Windsor Pro EV मध्ये कंपनीने प्रदान केलेली 52.9 KWh क्षमतेची बॅटरी आहे. जे एका चार्जवर 449 किमी पर्यंत चालवता येते. 60 किलोवॅट डीसी फास्ट चार्जर वापरून ही कार फक्त 50 मिनिटांत 20 ते 80 टक्के चार्ज करता येते. त्यात बसवलेले मोटर त्याला 136 पीएसची पॉवर आणि 200 न्यूटन मीटरचा टॉर्क देते.
टाटा कर्व्ह ईव्ही 45 किलोवॅट प्रति तास आणि 55 किलोवॅट प्रति तास क्षमतेच्या दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. जे 0-100 टक्के चार्ज होण्यासाठी एक तास घेते. कर्व्हमध्ये बसवलेले मोटर या कारला 110 किलोवॅटची पॉवर आणि 215 न्यूटन मीटरचा टॉर्क देते. ज्यामुळे 0-100 किलोमीटरचा वेग गाठण्यासाठी 8.6 सेकंद लागतात. एका चार्जमध्ये ही कार 502 किलोमीटरची रेंज देते.
एमजी विंडसर प्रो ईव्हीची किंमत 18.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि ती BaaS (Battery-as-a-Service) सोबत 13.09 लाख रुपयात खरेदी करता येईल.
Tata Curvv EV ची किंमत 17.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटची किंमत 21.99 लाख रुपये आहे.