फोटो सौजन्य: Social Media
भारतात बाईक्सच्या विक्रीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. विविध प्रकारच्या बाईक मार्केटमध्ये पाहायला मिळतात. यात हाय परफॉर्मन्स बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. त्यामुळेच देशात अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट आणि स्टायलिश बाईक ऑफर करत असतात. KTM हे त्यातीलच एक आघाडीचे नाव. नुकतेच कंपनीने नवीन बाईक लाँच केली आहे.
KTM इंडियाने त्यांच्या बाईक्स अपडेट करून भारतीय मार्केटमध्ये आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच कंपनीने लेटेस्ट फीचर्ससह 390 Enduro आणि 390 Adventure लाँच केली आहे. आता कंपनीने त्यांच्या सुपरस्पोर्ट सेगमेंटला अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने याची सुरुवात KTM RC 200 ने केली आहे. कंपनीने ही बाईक नवीन रंगाने अपडेट केली आहे. चला जाणून घेऊयात, KTM RC 200 मध्ये कोणते नवीन फीचर्स दिले आहेत.
7 व्हेरियंटमध्ये लाँच झाली 2025 Kia Carens Clavis, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
केटीएम आरसी 200 च्या 2025 मॉडेलला नवीन मेटॅलिक ग्रे रंगाने अपडेट करण्यात आले आहे. ही बाईक जुन्या ब्लॅक आणि ब्ल्यू कलरसोबत विकली जाणार आहे. मेटॅलिक ग्रे कलर दोन कलर्समध्ये येतात जे एकमेकांसोबत छान दिसतात. यामध्ये, चेसिस आणि फ्रंट फेअरिंगवर ऑरेंज रंग वापरण्यात आला आहे, जो त्याला आकर्षक लूक देतो. त्याच्या ब्ल्यू व्हेरियंटमध्ये ऑरेंज तर मेटॅलिक ग्रे आणि ब्लॅक व्हेरियंटमध्ये ब्लॅक व्हील्स आहेत.
अलीकडेच केटीएमने त्यांच्या काही बाईक्सच्या किमती वाढवल्या आहेत, ज्यामध्ये आरसी 200 ची किंमत सर्वात जास्त वाढली आहे. त्याची किंमत 12,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. ज्यांच्या या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.54 लाख रुपये झाली आहे. नवीन मेटॅलिक ग्रे व्हेरियंट देखील त्याच किमतीत विकला जाणार आहे.
कहरच ! 15 लाखांच्या किमतीत फक्त 2 लोकांसाठीच बनवली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार
KTM RC 200 मध्ये 199.5cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन वापरले आहे, जे 24.65 bhp पॉवर आणि 9.2 Nm टॉर्क निर्माण करते. त्याचे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे, जे राइड सुरळीत आणि नियंत्रित ठेवते. रंगासोबतच त्याचे इंजिन देखील अपडेट करण्यात आले आहे. त्याचे इंजिन BS6 फेज 2 OBD2B उत्सर्जन नियमांची पूर्तता करण्यासाठी अपडेट करण्यात आले आहे. यात ड्युअल-चॅनेल ABS, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि LED लाइटिंगसह डिस्क ब्रेक आहेत.