फोटो सौजन्य: Pinterest
350cc सेगमेंटमध्ये Royal Enfield Hunter 350 आणि Goan Classic 350 या दोन्ही लोकप्रिय बाईक. एकीकडे शहरी-केंद्रित रोडस्टर आहे तर दुसरीकडे आरामदायी बॉबर आहे. चला दोन्ही बाईक्समधील बद्दल जाणून घेऊयात.
परदेशात नवीन युनिट्स येईना अन् भारतात ग्राहकच मिळेना! Maruti Suzuki च्या ‘या’ कारची बातच न्यारी
दोन्ही बाईकच्या किमतीत लक्षणीय फरक आहे. हंटर 350 ही कंपनीची सर्वात परवडणारी बाईक आहे, जी विशेषतः नवीन रायडर्स आणि दैनंदिन शहरातील रायडर्सना लक्षात घेऊन डिझाइन केलेली आहे. तर, गोअन क्लासिक 350 ही रॉयल एनफील्डच्या 400 सीसी श्रेणीतील सर्वात प्रीमियम बाईक आहे. ही अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना बॉबर स्टाइल आणि दमदार फीचर्ससाठी अतिरिक्त पैसे देण्यास हरकत नाही.
Hunter 350 चा छोटा व्हीलबेस शहरातील ट्रॅफिकमध्ये या बाईकला अधिक चपळ बनवतो. कमी कर्ब वेटमुळे टाईट U-टर्न घेणे तसेच गर्दीच्या रस्त्यांवर बाईक सहज हाताळता येते. याचे ग्राउंड क्लीयरन्स शहरातील स्पीड ब्रेकर आणि दैनंदिन वापरासाठी पुरेशी आहे. राउंड हेडलॅम्प आणि मिरर्समुळे बाईकला रेट्रो टच मिळतो, तर कॉम्पॅक्ट बॉडी डिझाइनमुळे ती मॉडर्न लुक देते. ही बाईक फॅक्टरी ब्लॅक, डॅपर ग्रे, रिबेल ब्लू, लंडन रेड, टोकियो ब्लॅक आणि ग्रेफाइट ग्रे अशा रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
भारताचा मास्टरस्ट्रोक! ‘या’ Trade Deal मुळे BMW आणि Mercedes सर्वसामान्यांना परवडणार
Goan Classic 350 चे डिझाइन आणि एर्गोनॉमिक्स पूर्णपणे रिलॅक्स्ड राईडिंगवर आधारित आहेत. कमी सीट हाइट, मिनी एप-हॅंगर हँडलबार आणि पुढे सेट केलेले फुटपेग्स यामुळे ही बाईक अत्यंत आरामदायक बॉबर ठरते. जास्त ग्राउंड क्लीयरन्समुळे खराब किंवा तुटलेल्या रस्त्यांवरही अधिक आत्मविश्वास मिळतो. सिंगल-पीस सीट, स्लॅश-कट एक्झॉस्ट आणि छोटा रियर फेंडर हे क्लासिक बॉबर स्टाइलिंग अधोरेखित करतात. ही बाईक पर्पल हेज, शेक ब्लॅक, ट्रिप टील आणि रेव रेड रंगांमध्ये ऑफर केली जाते.
दोन्ही बाईक्समध्ये सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला असला तरी त्यांची मांडणी वेगळी आहे. USB चार्जिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल-SMS अलर्ट आणि Tripper नेव्हिगेशन हे फीचर्स दोन्हीमध्ये स्टँडर्ड आहेत.
Hunter 350 चा स्पीडोमीटर अधिक शार्प आणि मॉडर्न दिसतो. त्याची रेड नीडल तेज उन्हातही स्पष्ट दिसते, तर LCD डिस्प्ले लेआउट बाईकला युथफुल फील देतो.
Goan Classic 350 चा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अधिक पारंपरिक शैलीचा असून त्यात क्लासिक ॲनालॉग स्पीडोमीटर आणि खाली स्वतंत्र LCD स्क्रीन देण्यात आली आहे, जी त्याच्या बॉबर कॅरेक्टरशी सुसंगत आहे.
Royal Enfield Hunter 350 आणि Royal Enfield Goan Classic 350 या दोन्ही बाईक्समध्ये कंपनीचा प्रसिद्ध J-सीरिज इंजिन देण्यात आला आहे, जो लो आणि मिड-रेंज टॉर्कसाठी ओळखला जातो. शहरातील वापरात तिसऱ्या किंवा चौथ्या गिअरमध्येही बाईक स्मूदपणे चालते. दोन्ही मॉडेल्समध्ये स्लिप-अँड-असिस्ट क्लच स्टँडर्ड देण्यात आला असून, त्यामुळे ट्रॅफिकमध्ये क्लच ऑपरेशन हलके आणि कमी थकवणारे ठरते.






