Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra BE6 खरेदी करण्याचे स्वप्न होईल साकार! EMI 25,000 पेक्षा कमी; जाणून घ्या डाउन पेमेंटचं गणित

लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही महिंद्रा बीई6 ला देशात चांगली मागणी मिळतेय. मात्र, हीच प्रीमियम इलेक्ट्रिक कार तुम्ही सहज EMI च्या मदतीने खरेदी करू शकतात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 30, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • महिंद्राची इलेक्ट्रिक कार BE6 ला चांगली मागणी
  • फक्त 23,931 रुपयांच्या ईएमआयसह ही कार आणली जाऊ शकते
  • जाणून घ्या डाउन पेमेंट आणि हिशोब
देशातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या Mahindra कंपनीकडून भारतीय बाजारपेठेत विविध सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री केली जाते. या कंपनीकडून उपलब्ध असलेल्या मॉडेल्समध्ये, ‘महिंद्रा BE6’ ही इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील खरेदीसाठी उपलब्ध आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. 5 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट भरल्यानंतर, ही कार घरी आणण्यासाठी तुम्हाला किती EMI द्यावा लागेल त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महिंद्रा BE6 ची किंमत

महिंद्रा कंपनी BE6 च्या ‘बेस व्हेरिएंट’ची किंमत 18.90 लाख रुपये आहे. जर ही कार दिल्लीत खरेदी केली, तर त्याची ऑन-रोड किंमत अंदाजे 19.87 लाख रुपये इतकी होते.

Maruti Swift Vs Tata Punch: एक हॅचबॅक तर दुसरी एसयूव्ही; मात्र किंमत, फीचर्स आणि इंजिनच्या बाबतीत कोणती कार बेस्ट?

5 लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटनंतरचा EMI

जर तुम्ही या कारचा ‘बेस व्हेरिएंट’ खरेदी केला, तर बँक तुम्हाला ‘एक्स-शोरूम’ किमतीवर आधारित फायनान्स करेल. परिणामी, 5 लाख रुपयांचे ‘डाऊन पेमेंट’ केल्यानंतर, उर्वरित अंदाजे 14.87 लाख रुपयांची रक्कम तुम्हाला बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात घ्यावी लागेल. जर बँकेने तुम्हाला 14.87 लाख रुपयांचे कर्ज 9% व्याजदराने आणि सात वर्षांच्या कालावधीसाठी मंजूर केले, तर पुढील सात वर्षांपर्यंत तुम्हाला दरमहा केवळ 23,931 रुपयांचा EMI भरावा लागेल.

या कारची एकूण किंमत किती असेल?

जर तुम्ही बँकेकडून 14.87 लाख रुपयांचे कार कर्ज सात वर्षांच्या कालावधीसाठी आणि 9% व्याजदराने घेतले, तर तुम्हाला या संपूर्ण सात वर्षांच्या कालावधीत दरमहा 23,931 रुपयांचा EMI भरावा लागेल. या सात वर्षांच्या काळात, महिंद्रा BE6 साठी तुम्हाला व्याजापोटी अंदाजे 5.22 लाख रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. परिणामी, या कारची एकूण किंमत, ज्यामध्ये ‘एक्स-शोरूम’ किंमत, ‘ऑन-रोड’ शुल्क आणि भरलेले व्याज यांचा समावेश आहे, अंदाजे 25.10 लाख रुपये इतकी होईल.

Electric 2-Wheeler Sales:‘या’ एका कारणामुळे मार्च 2026 मध्ये इलेक्ट्रिक टू-व्हिलरच्या विक्रीत झपाझप झाली वाढ

ही कार कोणाशी स्पर्धा करेल?

Mahindra BE6 ला बाजारातील अनेक SUVs कडून स्पर्धेचा सामना करावा लागत असला, तरी तिच्या थेट प्रतिस्पर्ध्यांमध्ये , Hyundai Creta Electric, Tata Curvv EV, MG Windsor EV आणि Vinfast VF6 यांसारख्या इलेक्ट्रिक SUVs चा समावेश होतो.

 

Web Title: Mahindra be6 can be purchased with the emi of 25 thousand rupees know finance plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Mahindra

संबंधित बातम्या

भारतीय बाजारात लाँच होण्यापूर्वी Jetour T2 Plug-In Hybrid SUV ला परदेशात मिळाला मोठा अपडेट! जाणून घ्या माहिती
1

भारतीय बाजारात लाँच होण्यापूर्वी Jetour T2 Plug-In Hybrid SUV ला परदेशात मिळाला मोठा अपडेट! जाणून घ्या माहिती

Volkswagen  India: १० लाखांपेक्षा कमी किमतीत येतेय फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV! पाहा काय असतील फीचर्स
2

Volkswagen  India: १० लाखांपेक्षा कमी किमतीत येतेय फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV! पाहा काय असतील फीचर्स

Royal Enfield: नवीन फीचर्ससह लाँच झाली ‘Royal Enfield Continental GT 650′; ३.५८ लाखांपासून किंमत सुरू
3

Royal Enfield: नवीन फीचर्ससह लाँच झाली ‘Royal Enfield Continental GT 650′; ३.५८ लाखांपासून किंमत सुरू

Upcoming New Car Models: येत्या सप्टेंबरपर्यंत लाँच होणार ६ भन्नाट कार मॉडेल्स! पाहा काय असेल खास
4

Upcoming New Car Models: येत्या सप्टेंबरपर्यंत लाँच होणार ६ भन्नाट कार मॉडेल्स! पाहा काय असेल खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.