आता Mahindra Bolero Neo मिळेल खिश्याला परवडणाऱ्या किमतीत (फोटो सौजन्य: @MahindraBolero/ X.com)
भारतात एसयूव्ही वाहनांची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. त्यातही एसयूव्ही म्हंटलं की सर्वात पहिले नाव महिंद्राचे येते. कंपनी आपल्या दमदार आणि हाय परफॉर्मन्स एसयूव्हीसाठी ओळखली जाते. अशातच, कंपनीने आपल्या एका कारवर ऑगस्ट 2025 च्या महिन्यात बंपर डिस्काउंट देत आहे.
जर तुम्ही महिंद्रा बोलेरो निओ खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण ऑगस्ट 2025 मध्ये या कारवर आकर्षक डिस्काउंट ऑफर दिला जात आहे. गाव आणि शहर दोन्हीसाठी किफायतशीर एसयूव्ही शोधत असलेल्या ग्राहकांसाठी ही उत्तम संधी ठरू शकते. चला तर मग बोलेरो निओवरील डिस्काउंट ऑफर, किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
नवीन अवतारात दिसेल Mahindra XUV 700, लाँच होण्याआधीच इंटिरिअरची मिळाली माहिती
एका वेबसाइटच्या अहवालानुसार, ऑगस्ट 2025 मध्ये महिंद्रा बोलेरो निओ खरेदी करताना ग्राहकांना तब्बल 1 लाख 9 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळू शकतो. याशिवाय, 30 हजार रुपयांपर्यंत मोफत अॅक्सेसरीज देखील मिळतील, ज्यामध्ये फॉग लॅम्प, साइड स्टेप्स, प्रीमियम सीट कव्हर्स आणि इतर आकर्षक अॅक्सेसरीजचा समावेश आहे.
Mahindra Bolero Neo च्या टॉप व्हेरिएंट 11.48 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत खरेदी केली जाऊ शकते. जर ही कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली, तर त्यात सुमारे 1.43 लाख रुपये आरटीओ चार्जेस आणि अंदाजे 55 हजार रुपये इन्शुरन्सचा खर्च अतिरिक्त जोडला जातो. या सर्वांचा एकत्रित विचार करता, या एसयूव्हीची दिल्लीतील ऑन-रोड किंमत जवळपास 13.57 लाख रुपये इतकी होते.
‘या’ 4 कारणांमुळे कारचा सस्पेन्शन अचानकच देतो धोका, वेळीच राहा खबरदार
महिंद्रा बोलेरो निओ विशेषतः भारतीय रस्त्यांचा विचार करून आणि कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. यात दमदार इंजिन, उत्कृष्ट ग्राउंड क्लिअरन्स आणि आकर्षक इंटिरिअरची सुविधा दिली आहे. शहरातील ड्रायव्हिंगसाठी तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही एसयूव्ही तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन ठरले.
महिंद्रा बोलेरो निओ भारतीय मार्केटमधील अनेक लोकप्रिय एसयूव्हींशी थेट स्पर्धा करते. यामध्ये Maruti Grand Vitara, Hyundai Creta, Honda Elevate आणि Kia Seltos सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. ही परवडणारी किंमत आणि मजबूत बिल्ड क्वालिटीमुळे, बोलेरो निओ ग्राहकांसाठी एक किफायतशीर पर्याय बनते.
जर तुम्ही 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला उर्वरित 11.57 लाख रुपये बँकेकडून फायनान्स करावा लागेल. समजा बँक तुम्हाला ही रक्कम 7 वर्षांच्या लोन कालावधीसाठी 9% व्याजदराने देते, तर तुम्हाला दरमहा सुमारे 18,621 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.