
किंमत आणि इंजिन पर्याय
महिंद्रा XUV 3XO REVX EDGE ची सुरुवातीची किंमत ₹9.39 लाख आहे. 1.2-लिटर mStallion टर्बो-पेट्रोल इंजिनसह मॅन्युअल व्हर्जनची किंमत ₹9.39 लाख, तर ऑटोमॅटिक व्हर्जन ₹10.59 लाख आहे. 1.5-लिटर टर्बो-डिझेल मॅन्युअल व्हर्जनसाठी ₹10.59 लाख मोजावे लागतील.
REVX EDGE (O) ची पेट्रोल मॅन्युअल किंमत ₹9.89 लाख, पेट्रोल ऑटोमॅटिक ₹11.09 लाख आणि डिझेल मॅन्युअल ₹11.09 लाख आहे. डिझेल AMT व्हर्जनची किंमत ₹11.91 लाख आहे. याशिवाय REVX M(O) मध्ये पेट्रोल ऑटोमॅटिक पर्याय ₹9.99 लाखांमध्ये देण्यात आला आहे.
₹9.89 लाखांत मिळणार पॅनोरॅमिक सनरूफ
REVX EDGE मध्ये 26.03 सेमी HD इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस Android Auto, वायर्ड Apple CarPlay, क्रूझ कंट्रोल, रिअर-व्ह्यू कॅमेरा, लेदरेट सीट्स आणि मागील AC व्हेंट्स यांसारखी फीचर्स मिळतात. तसेच 60:40 स्प्लिट रिअर सीट, इलेक्ट्रिक ORVM आणि ड्रायव्हर सीटची उंची अडजस्ट करण्याची सुविधा आहे.
EDGE (O) व्हेरिएंटमध्ये याच फीचर्ससोबत पॅनोरॅमिक सनरूफ, रूफ रेल्स, इलेक्ट्रिकली फोल्डिंग ORVM, पॅसिव्ह कीलेस एंट्री, पुश-बटन स्टार्ट, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स आणि ऑटोमॅटिक वायपर्स दिले आहेत.
नवीन XUV 3XO REVX रेंजमध्ये Everest White, Stealth Black, Tango Red, Nebula Blue आणि Galaxy Grey असे रंग पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे ₹10 लाखांच्या आसपास फीचर-लोडेड कॉम्पॅक्ट SUV शोधणाऱ्या ग्राहकांसाठी या नव्या व्हेरिएंटमध्ये अनेक ऑप्शन उपलब्ध झाले आहेत.