फोटो सौजन्य: Pinterest
महिंद्राने बाजारात XUV 7XO ही कार उपलब्ध करून दिली आहे. लाँच झाल्यापासून आतापर्यंत, या SUV च्या 20000 युनिट्सची डिलिव्हरी करण्यात आली आहे. या कारची डिलिव्हरी अधिकृतपणे 14 जानेवारी रोजी सुरू झाली होती.
Vahan Portal : गाडी चालवणाऱ्यांसाठी Government चे आदेश, त्वरित मोबाईल नंबर अपडेट करा अन्यथा…
निर्मात्याने लाँचच्या वेळीच जाहीर केले होते की या एसयूवीच्या 40 हजार युनिट्स इंट्रोडक्टरी किंमतीत दिल्या जातील. यापैकी 20 हजार युनिट्सची डिलिव्हरी पूर्ण झाली असून आता उर्वरित 20 हजार युनिट्स या विशेष किंमतीत उपलब्ध राहणार आहेत.
ही इंट्रोडक्टरी ऑफर मर्यादित युनिट्ससाठीच लागू आहे. त्यानंतर या एसयूव्हीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक प्रगत आणि आकर्षक फीचर्स दिले आहेत. यात Harman Kardon ऑडिओ सिस्टम, 540 डिग्री कॅमेरा, लेव्हल-2 ADAS, लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टम, पॅनोरमिक सनरूफ, बॉस मोड, रिअर सीटसाठी स्क्रीन, AdrenoX सिस्टमसह फ्रंटला ट्रिपल स्क्रीन अशा सुविधा मिळतात. तसेच या एसयूवीमध्ये पहिल्यांदाच Alexa आणि ChatGPT इंटिग्रेशनही देण्यात आले आहे.
क्लासिक डिझाइन आणि हाय-टेक अंदाज; Royal Enfield ची पहिली e-bike, पाहा रेंज आणि भन्नाट फीचर्स
या एसयूव्हीमध्ये महिंद्राकडून 2.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 200 हॉर्सपॉवरची ताकद निर्माण करते. याशिवाय 2.2 लिटर टर्बो डिझेल इंजिनचेही पर्याय उपलब्ध आहेत. ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक असे दोन पर्याय दिले आहेत.
या एसयूव्ही एक्स-शोरूम किंमत 13.66 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंटसाठी ही किंमत 24.11 लाख रुपयांपर्यंत जाते.






