(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
रॉयल एनफिल्डची ही ई-बाईक सामान्य इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या तुलनेत बरीच वेगळी आणि खास आहे. तिचे रेट्रो-मॉडर्न डिझाइन रस्त्यावर तिचे एक अनोखे अस्तित्व निर्माण करतं आणि तुमची नजर फ्लाइंग फ्ली C6 वर खिळून राहतात. यात १९-इंची अलॉय व्हील्स, अनोखे गर्डर-स्टाईल फ्रंट सस्पेंशन आणि मागे मोनोशॉक सस्पेंशन, गोल एलईडी हेडलॅम्प, हँडलबारच्या खाली लावलेले एलईडी इंडिकेटर्स, सरळ हँडलबार, एलईडी टेललाइट तिला इतरांपेक्षा आकर्षक बनवतात.
रॉयल एनफील्डच्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल, फ्लाइंग फ्ली C6 च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हलक्या वजनाच्या फोर्ज्ड ॲल्युमिनियम फ्रेमवर बनवलेल्या या मोटरसायकलमध्ये मॅग्नेशियम फिन्स असलेले बॅटरी केसिंग वापरले आहे. यात रिमोट लॉक/अनलॉक, जिओ-फेन्सिंग, वायरलेस फोन चार्जिंग, कॉर्नरिंग एबीएस, ३-लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल आणि लीन-सेन्सिंग टेक्नॉलॉजी, तसेच सिटी, हायवे, स्पोर्ट, रेन आणि कस्टम असे ५ रायडिंग मोड्स देखील आहेत.
रॉयल एनफिल्ड फ्लाइंग फ्ली C6 मध्ये 3.91 kWh क्षमतेची बॅटरी आहे, जी कंपनीच्या दाव्यानुसार एका चार्जवर 154 किमी पर्यंत प्रवास करू शकते. ही इलेक्ट्रिक मोटरसायकल 15.4 kW मोटरद्वारे चालते. फ्लाइंग फ्ली C6 केवळ 3.7 सेकंदात 0-60 किमी प्रति तास वेग गाठू शकते आणि तिचा सर्वोच्च वेग 115 किमी प्रति तास आहे.






