Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra XUV 7XO Sales: महिंद्रा XUV 7XO ने लाँच झाल्यानंतर अवघ्या ७ महिन्यांतच गाठला ७०,००० युनिट्स विक्रीचा टप्पा

महिंद्रा XUV 7XO ने लाँच झाल्यापासून केवळ ७ महिन्यांत ७०,००० युनिट्स विक्रीचा पल्ला पार करत बाजारात मोठा विक्रम केला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 30, 2026 | 03:49 PM
Mahindra XUV 7XO Sales: महिंद्रा XUV 7XO ने लाँच झाल्यानंतर अवघ्या ७ महिन्यांतच गाठला ७०,००० युनिट्स विक्रीचा टप्पा
Follow Us
Follow Us:
  • महिंद्रा XUV 7XO ने लाँच झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यांच्या आत ७०,००० युनिट्स विक्रीचा टप्पा पूर्ण केला.
  • या एसयूव्हीमध्ये टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह ६ आणि ७-सीट लेआउटचे पर्याय मिळतात.
  • या गाडीच्या टॉप-एंड व्हेरियंट्समध्ये ट्रिपल स्क्रीन डॅशबोर्ड आणि लेव्हल २ अडॅस यांसारखी आधुनिक फीचर्स आहेत.

महिंद्राने भारतीय बाजारात आपल्या महिंद्रा XUV 7XO  या एसयूव्हीसह मोठा विक्रम केला आहे. लाँच झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यांत या गाडीने ७०,००० युनिट्स विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. XUV 700 ची जागा घेतलेल्या या नवीन मॉडेलच्या एक्सटेरीयर आणि केबिनमध्ये मोठे बदल करण्यात आले असून ग्राहकांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या विस्तृत रेंजची किंमत १३.९९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेल AX7 लक्झरी डिझेल AWD ऑटोमॅटिकसाठी २५.७९ लाख रुपयांपर्यंत जाते.

इंजिन आणि परफॉर्मन्स

XUV 7XO मध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत,

  • २.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन: हे इंजिन २०३ PS पॉवर आणि ३८० Nm टॉर्क जनरेट करते.
  • २.२-लिटर टर्बो डिझेल इंजिन: हे मॅन्युअल गिअरबॉक्ससह १८५ PS पॉवर आणि ४२० Nm टॉर्क देते, तर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह टॉर्क ४५० Nm पर्यंत वाढतो.
ही दोन्ही इंजिने ६-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह येतात, तसेच निवडक डिझेल AT ट्रिममध्ये ऑल-व्हील ड्राईव्हचा पर्यायही उपलब्ध आहे.

Ather Konarc: एथरची नवी फॅमिली स्कूटर ‘कोनार्क’ लाँच; ९९,९९९ रुपयांपासून सुरू होते किंमत आणि मिळतोय २०० किमीपर्यंतचा रेंज ऑप्शन

डायमेंशन आणि सिटींग

या एसयूव्हीची लांबी ४,६९५ मिमी, रुंदी १,८९० मिमी आणि उंची १,७५५ मिमी असून याचा व्हीलबेस २,७५0 मिमी आहे. महिंद्रा यात ६ आणि ७ सीटर कॉन्फिगरेशनचे ऑप्शन देत आहे, ज्यामुळे ग्राहकांना सेकंड-रो मध्ये कॅप्टन सीट्स किंवा रेग्युलर तीन-सीट लेआउट निवडण्याचा पर्याय मिळतो. सुरळीत प्रवासासाठी यात फ्रन्टला इंडिपेंडेंट मॅकपर्सन स्ट्रट्स आणि रियरला मल्टि-लिंक अरेंजमेंटसह फ्रिक्वेन्सी सेलेक्टिव्ह डॅम्पिंग आणि DAVINCI सस्पेन्शन तंत्रज्ञान दिले आहे.

फीचर्स आणि लक्झरी

या गाडीच्या टॉप-एंड व्हेरियंट्समध्ये तीन १२.३-इंच डिस्प्लेसह ट्रिपल स्क्रीन डॅशबोर्ड दिला आहे, ज्यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सेंट्रल इन्फोटेनमेंट सिस्टम आणि फ्रंट पॅसेंजर डिस्प्लेचा समावेश आहे. याशिवाय यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, अ‍ॅलेक्सा बिल्ट-इन, चॅटजीपीटी इंटिग्रेशन, १६-स्पीकर Harman Kardon ऑडिओ सिस्टम (Dolby Vision आणि Dolby Atmos सह), व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरॉमिक सनरूफ आणि पॉवर्ड टेलगेट यांसारखी आधुनिक फीचर्स मिळतात.

Nissan Upcoming Cars: भारतात लवकरच लाँच होणार  निसानच्या या तीन नव्या दमदार एसयूव्ही! जाणून घ्या काय आहेत खासियत

सेफ्टी फीचर्स

व्हेरियंटनुसार, XUV 7XO मध्ये सेफ्टीसाठी ७ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल-होल्ड आणि हिल-डिसेंट असिस्ट, टायर-प्रेशर मॉनिटरिंग, ५४०-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल २ ADAS यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

Web Title: Mahindra xuv 7xo achieves sales milestone in seven months auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Mahindra
  • SUV

संबंधित बातम्या

Nissan Upcoming Cars: भारतात लवकरच लाँच होणार  निसानच्या या तीन नव्या दमदार एसयूव्ही! जाणून घ्या काय आहेत खासियत
1

Nissan Upcoming Cars: भारतात लवकरच लाँच होणार  निसानच्या या तीन नव्या दमदार एसयूव्ही! जाणून घ्या काय आहेत खासियत

Ather Konarc: एथरची नवी फॅमिली स्कूटर ‘कोनार्क’ लाँच; ९९,९९९ रुपयांपासून सुरू होते किंमत आणि मिळतोय २०० किमीपर्यंतचा रेंज ऑप्शन
2

Ather Konarc: एथरची नवी फॅमिली स्कूटर ‘कोनार्क’ लाँच; ९९,९९९ रुपयांपासून सुरू होते किंमत आणि मिळतोय २०० किमीपर्यंतचा रेंज ऑप्शन

Hero Xtreme 160R 4V विरुद्ध TVS Apache RTR 160 4V! स्पोर्टी लुक आणि पिकअपमध्ये कोणती बाईक ठरेल बेस्ट?
3

Hero Xtreme 160R 4V विरुद्ध TVS Apache RTR 160 4V! स्पोर्टी लुक आणि पिकअपमध्ये कोणती बाईक ठरेल बेस्ट?

2027 Kawasaki Versys 650 VS Triumph Tiger Sport 660: मिड-साईज ॲडव्हेंचर टूररमध्ये कोणती बाईक खरेदी करणे फायद्याचे ठरेल?
4

2027 Kawasaki Versys 650 VS Triumph Tiger Sport 660: मिड-साईज ॲडव्हेंचर टूररमध्ये कोणती बाईक खरेदी करणे फायद्याचे ठरेल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.