फोटो सौजन्य: Social Media
पूर्वी कार खरेदी करताना अनेक ग्राहक फक्त एकाच गोष्टीकडे जास्त पाहायचे. ती गोष्ट म्हणजे कारची किंमत. पण जसजशी वेळ बदलत गेली. तसतसे ग्राहकांचे विचार बदलत गेले. आजचा ग्राहक कार खरेदी करताना फक्त किंमतीकडे पाहता नाही तर त्यातील सेफ्टी फीचर्सकडे देखील बारकाईने लक्ष देतो. अनेक कार उत्पादक कंपन्या देखील आपल्या नवीन कारमध्ये उत्तम सेफ्टी फीचर्स समाविष्ट करत आहे. तसेच कारचे क्रॅश टेस्टिंग करताना दिसत आहे, ज्यात सेफ्टी रेटिंग्स दिल्या जातात.
उद्याचा दिवस Audi चा ! लाँच करणार अशी लक्झरी कार जी पाहताच क्षणी पाडेल भुरळ
मारुती सुझुकी भारतीय मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. Maruti Breeza ही कंपनीने सब फोर मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणली आहे. 2025 मध्ये ही एसयूव्ही खरेदी करणे आता आणखी सुरक्षित झाले आहे. कंपनीने त्यात ESP, Hill Hold सारखे सेफ्टी फीचर्स दिले आहे. तसेच यात 6 एअरबॅग देखील देण्यात आले आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
मारुतीने ब्रेझा एसयूव्हीला पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या अंतर्गत आता या एसयूव्हीमध्ये 6 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. या एअरबॅग्ज सर्व आता या एसयूव्हीच्या सर्व व्हेरियंटमध्ये दिले जात आहे.
मारुती ब्रेझामध्ये कंपनी ईएसपी, हिल होल्ड असिस्ट, फ्रंट सीट बेल्ट प्री-टेन्शनर, फोर्स लिमिटर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, इन्फोग्राफिक डिस्प्ले, हाय स्पीड अलर्ट वॉर्निंग, सीट बेल्ट रिमाइंडर लॅम्प, अँटी थेफ्ट सिक्युरिटी सिस्टम, इंजिन इमोबिलायझर, आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज, शोल्डर हाईट अॅडजस्टेबल फ्रंट सीट बेल्ट यांसारखी सेफ्टी फीचर्स प्रदान करते.
8 लाखच्या बजेटमध्ये खरेदी करा 5 क्लासिक SUV कार, उत्तम मायलेजसह मिळतील धमाकेदार फिचर्स
मारुती ब्रेझामध्ये 1.5 लिटर क्षमतेचे K15C स्मार्ट हायब्रिड इंजिन आहे. ज्यामुळे त्याला 103.1 पीएसची पॉवर आणि 136.8 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. यात 48 लिटरची इंधन टाकी आहे आणि मॅन्युअल ट्रान्समिशनसह ही एसयूव्ही एका लिटरमध्ये 19.89 किलोमीटरपर्यंत चालवता येते. तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये ही एसयूव्ही 19.80 किलोमीटर मायलेज देते.
मारुती ब्रीझाची एकूण लांबी 3995 मिमी आहे. त्याची रुंदी 1790 मिमी, उंची 1685 मिमी आहे. त्याचा व्हीलबेस 2500 मिमी आहे आणि त्याची बूट स्पेस 328 लिटर आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये मारुतीने ब्रेझाची किंमत अपडेट केली गेली आहे. आता ही एसयूव्ही 8.54 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल. त्याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 13.98 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.