फोटो सौजन्य: @carwowuk (X.com)
भारतीय बाजारात अनेक सेगमेंटमध्ये कार विकल्या जातात. यातीलच एक महत्वाचा सेगमेंट म्हणजे लक्झरी कार. आजही रस्त्यावरून एखादी लक्झरी कार जाताना दिसली की अनेकांच्या नजरा त्यावर रोखल्या जातात. लक्झरी कारचे आपण मालक व्हावं असे अनेक जणांचे स्वप्न देखील असते.
देशात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे ऑडी. अनेक सेलिब्रेटी आणि राजकारणी मंडळी आपल्या कार कलेक्शनमध्ये ऑडीच्या कारचा समावेश करत असतात. कंपनी देखील भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मार्केटमध्ये नवनवीन फीचर्स असणाऱ्या कार लाँच करत असते.
8 लाखच्या बजेटमध्ये खरेदी करा 5 क्लासिक SUV कार, उत्तम मायलेजसह मिळतील धमाकेदार फिचर्स
आता जर्मन ऑटोमोबाईल उत्पादक ऑडी कंपनी लवकरच ऑडी भारतात एक नवीन कार लाँच करण्याची तयारी करत आहे, ज्यामध्ये शक्तिशाली इंजिन आणि फीचर्स उपलब्ध असतील. ही नवीन कार कधी लाँच होईल आणि त्याची संभाव्य किंमत काय असू शकते? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
ऑडी लवकरच भारतात नवीन कार आणण्याची तयारी करत आहे. कंपनी ऑडी आरएस क्यू८ परफॉर्मन्स लाँच करू शकते. या कारमध्ये शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट फीचर्स देण्यात येतील.
कंपनी ऑडी आरएस क्यू8 परफॉर्मन्समध्ये चार-लिटर V8 इंजिन देईल. ज्यामुळे यता कारला 631 हॉर्सपॉवर आणि 627 न्यूटन मीटर टॉर्क मिळेल. या कारमध्ये कंपनीकडून 8-स्पीड ट्रिपट्रॉनिक ट्रान्समिशन दिले जाईल. ही कार फक्त 3.4 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेगाने चालवता येणार आहे. याची टॉप स्पीड ताशी 250 किलोमीटरपर्यंत असेल.
बाजारात ग्राहक अनेक पण ‘या’ SUV साठी ठरतेय डोकेदुखी, विक्रीच होईना; कारण काय?
ऑडी आरएस क्यू8 परफॉर्मन्स एसयूव्हीमध्ये कंपनीकडून अनेक उत्तम फीचर्ससह सेफ्टी फीचर्स दिले जातील. यात 22 आणि 23 इंच अलॉय व्हील्स, 360 डिग्री कॅमेरा, 12.3 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 12.3 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 23 स्पीकर्ससह Bang and Olufsen ऑडिओ सिस्टम, ऑडी कनेक्ट केअर, हेड-अप डिस्प्ले, समोर हनीकॉम्ब ग्रिल, मॅट्रिक्स एलईडी लाईट्स, डिजिटल ओएलईडी टेल लाईट्स, आरएस एक्सटीरियर आणि इंटीरियर पॅकेज, कार्बन पॅकेज, स्पोर्ट सीट्स, सिरेमिक ब्रेक्स, अॅक्टिव्ह रोल स्टॅबिलायझेशन, रियर स्पोर्ट डिफरेंशियल, आरएस ट्यून केलेले अॅडॉप्टिव्ह एअर सस्पेंशन, पॅनोरॅमिक सनरूफ, अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल असिस्ट विथ लेन गाइडन्स, इंटरसेक्शन असिस्ट, रिमोट पार्क असिस्ट प्लस, नाईट व्हिजन असिस्ट अशी अनेक फीचर्स असतील.
कंपनी 17 फेब्रुवारी 2025 रोजी ही एसयूव्ही अनधिकृतपणे भारतीय बाजारात लाँच केली जाईल. या कारचे बुकिंग लाँच होण्यापूर्वीच सुरू झाले आहे. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने 5 लाख रुपयांमध्ये बुकिंग करता येईल.
भारतात लाँच झाल्यानंतरच या कारच्या नेमक्या किंमतीबद्दल खुलासा होईल. पण अशी अपेक्षा आहे की याची किंमत 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते.