
फोटो सौजन्य: Pinterest
Maruti Suzuki ने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. मारुती सुझुकी डिझायर ही तर नेहमीच भारतीय ग्राहकांमध्ये पसंती राहिली आहे. गेल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर 2025 मध्ये मारुती सुझुकी डिझायर देशातील सर्वाधिक विक्री होणारी सेडान बनली. गेल्या महिन्यात मारुती डिझायरचे एकूण 21,082 युनिट्स खरेदी केले. या काळात, वार्षिक आधारावर मारुती डिझायरच्या विक्रीत 78.98 टक्क्यांची वाढ झाली. या विक्रीच्या आधारावर, एकट्या मारुती डिझायरने या विभागातील 60.17 टक्क्यांहून अधिक बाजारपेठेचा हिस्सा काबीज केला.
मारुती सुझुकी डिझायर ही ग्राहकांमध्ये याच्या परवडणाऱ्या किमतीसाठी आणि उत्कृष्ट मायलेजसाठी ओळखली जाते. याची एक्स-शोरूम किंमत 6.25 लाखांपासून सुरू होते आणि 9.31 लाखांपर्यंत जाते. मायलेजच्या बाबतीत, डिझायरचा पेट्रोल व्हेरिएंट अंदाजे 22 ते 23 किमी/प्रति लिटर मायलेज देतो. तर सीएनजी व्हर्जनमध्ये हा आकडा सुमारे 31 किमी/किलोग्रॅमपर्यंत पोहोचतो.
27 KM मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सनरूफ! नव्या रूपात येणार भारतातील सर्वात स्वस्त SUV
या विक्री यादीत ह्युंदाई ऑरा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कालावधीत ह्युंदाई ऑराने एकूण 5,731 युनिट्स विकल्या, ज्यात वर्ष-दर-वर्ष 34.91 टक्क्यांची वाढ झाली. विक्री यादीत होंडा अमेझ तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात होंडा अमेझने एकूण 2,763 युनिट्स विकल्या, ज्यात वर्ष-दर-वर्ष 5.14 टक्क्यांची वाढ झाली. विक्री यादीत फोक्सवॅगन व्हर्टस चौथ्या क्रमांकावर आहे, ज्यात वर्ष-दर-वर्ष 52.71 टक्के वाढ झाली, एकूण 2,225 युनिट्सची नोंद झाली.
MG Motors च्या Cars आताच खरेदी करून घ्या! ‘या’ तारखेपासून किमतीत होणार वाढ
दुसरीकडे, टाटा टिगोरचे एकूण 488 युनिट्स विकले गेले, म्हणजेच वर्ष-दर-वर्ष 43.19 टक्क्यांची घट झाली आहे. टोयोटा कॅमरीच्या विक्रीत नवव्या क्रमांकावर आहे, वार्षिक आधारावर 70.77 टक्के वाढ नोंदवत एकूण 222 युनिट्स विकल्या. शिवाय, स्कोडा ऑक्टाव्हिया विक्रीत दहाव्या क्रमांकावर आहे, गेल्या महिन्यात स्कोडा ऑक्टाव्हियाला फक्त 94 नवीन ग्राहक मिळाले.