फोटो सौजन्य: Pinterest
टाटा मोटर्स जानेवारी 2026 मध्ये भारतीय बाजारात टाटा पंच फेसलिफ्ट लाँच करण्याची अपेक्षा आहे. या मायक्रो-एसयूव्हीला अधिक स्टायलिश, वैशिष्ट्यपूर्ण आणि आधुनिक मॉडर्न अपडेट मिळण्याची अपेक्षा आहे. ही कार अनेक वेळा टेस्टिंग करताना दिसली आहे. याच्या डिझाइन आणि केबिनमध्ये अनेक बदल होण्याची अपेक्षा आहे, तर इंजिन पर्याय सध्याच्या मॉडेलसारखेच राहतील अशी अपेक्षा आहे.
ग्राहकांची ‘या’ 3 Automatic Cars वरून नजरच हटत नाही! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
टाटा पंच फेसलिफ्टचे एक्सटिरिअर मोठ्या प्रमाणात पंच ईव्हीपासून प्रेरित असण्याची शक्यता आहे. यात नवीन फ्रंट ग्रिल, अपडेटेड बंपर, शार्प एलईडी डीआरएल, नवीन अलॉय व्हील्स आणि रिफ्रेश केलेले टेललॅम्प असू शकतात. एकूणच, कार पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक आणि प्रीमियम लूकमध्ये असेल.
Tata Punch Facelift च्या केबिनमध्ये मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये नवीन मल्टी-फंक्शन स्टीअरिंग व्हील, अपडेटेड डॅशबोर्ड लेआउट, 10.25-इंच मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल तसेच कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसारखी आधुनिक फीचर्स देण्यात येऊ शकतात.
रोजच्या प्रवासासाठी Best Car शोधताय? 5 लाखांच्या बजेटमध्ये एकापेक्षा एक पर्याय उपलब्ध
प्रवाशांच्या सेफ्टीच्या बाबतीत टाटा नेहमीच सेगमेंट-बेस्ट मानली जाते. नव्या Punch Facelift मध्ये 6 एअरबॅग्स (स्टँडर्ड) देण्यात येण्याची शक्यता असून त्यासोबत ABS सह EBD, ESC, हिल होल्ड असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा, ISOFIX चाइल्ड सीट माउंट आणि रिअर पार्किंग सेन्सर यांसारखी सेफ्टी फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे.
Tata Punch Facelift मध्ये फारसे बदल होणार नाहीत. यामध्ये सध्याचेच 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात येईल, जे सुमारे 88 PS पॉवर आणि 115 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत CNG व्हेरिएंटचा पर्यायही उपलब्ध राहणार आहे.
माइलेजच्या बाबतीत, पेट्रोल व्हेरिएंटमधून सुमारे 20 kmpl, तर CNG व्हेरिएंटमधून अंदाजे 27 km/kg पर्यंत माइलेज मिळण्याची शक्यता आहे.
सध्याची टाटा पंचची किंमत 5.50 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते. नवीन टाटा पंच फेसलिफ्टची किंमत 6.25 लाख (एक्स-शोरूम) ते 10 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत असण्याची अपेक्षा आहे. सुधारित डिझाइन, नवीन फीचर्स आणि मजबूत सेफ्टी पॅकेजसह, ते मायक्रो-एसयूव्ही सेगमेंटमध्ये ह्युंदाई एक्सटरला टक्कर देईल.






