Maruti Suzuki Offering Benefits Of Over Rs. 3 Lakh On Nexa Cars (फोटो सौजन्य-AI एआय)
दिवाळीच्या सणाचा फायदा घेण्यासाठी मारुती सुझुकी Nexa Cars Discount November 2026 अंतर्गत कंपनीने आपल्या निवडक कार्सवर आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. मारुती सुझुकी ग्रँड विटारा वर 3 लाख रुपयांपेक्षा जास्त बचत करता येणार असून, फ्रॉन्क्स, XL6, जिम्नी, ई विटारा आणि इन्व्हिक्टो या कार्सवरही विविध डिस्काउंट दिले जात आहेत. प्रीमियम कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या कस्टमर्ससाठी ही चांगली संधी ठरू शकते.
ग्रँड विटारावर सर्वात जास्त बचत
मारुती सुझुकीच्या नेक्सा लिस्टमध्ये ग्रँड विटारा सर्वाधिक बचतीची ऑफर मिळवणारी कार आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 10,76,500 रुपयांपासून सुरू होते. कंपनीकडून झिरो रोड टॅक्स ऑफरअंतर्गत 1.85 लाख रुपयांपर्यंत बचत मिळू शकते. याशिवाय 50,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस किंवा 45,000 रुपयांचा स्क्रॅपेज बोनस, 25,000 रुपयांचा PCM बोनस, 30,000 रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस आणि 15,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस दिला जात आहे. 5 वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटीही मोफत मिळणार आहे. 6 नोव्हेंबरपर्यंत बुकिंग केल्यास काही व्हेरिएंट्सवर 11,000 रुपयांची जास्त कॅश डिस्काउंट मिळू शकते.
मारुती सुझुकीच्या SUV विक्रीत 56% वाढ! फ्रॉन्क्सची बाजी, व्हिक्टोरिसनेही मारली मोठी झेप
फ्रॉन्क्स, XL6 आणि जिम्नीवर ऑफर्स
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स ची सुरुवातीची किंमत 6,89,900 रुपये असून, या कारवर एकूण 27,100 रुपयांपर्यंत बचत करता येईल. यामध्ये 5,000 रुपयांची कॅश डिस्काउंट, 6 नोव्हेंबरपर्यंत बुकिंग केल्यास 7,100 रुपयांची अतिरिक्त सूट आणि एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बोनसचा समावेश आहे. मारुती सुझुकी XL6 वर 61,000 रुपयांपर्यंत बचत मिळते. तर जिम्नी वर 35,000 रुपयांची कॅश डिस्काउंट दिली जात आहे.
मारुती सुझुकीने एक्स्पोर्ट केल्या 50,000 पेक्षा जास्त EV कार! e Vitara जवळपास 50 देशांमध्ये दाखल
ई विटारा आणि इन्व्हिक्टोवरही फायदे
मारुती सुझुकी ई विटारा ची सुरुवातीची किंमत 16,19,000 रुपये आहे. या इलेक्ट्रिक SUV वर 30,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि मोफत होम चार्जर व इन्स्टॉलेशन मिळते. त्यामुळे एकूण सेविंग 50,000 रुपयांपेक्षा जास्त होऊ शकते. मारुती सुझुकी इन्व्हिक्टो वर 95,000 रुपयांपर्यंत बचत मिळत असून, एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बोनस, लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट बोनसचा यात समावेश आहे. या ऑफर्स नोव्हेंबर 2026 साठी जाहीर करण्यात आल्या आहेत. डिस्काउंटची रक्कम व्हेरिएंट, डीलर आणि कस्टमरच्या पात्रतेनुसार बदलू शकते. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी जवळच्या नेक्सा डीलरकडून ऑफरची माहिती घेणे बरोबर ठरेल.
Ans: मारुती सुझुकी ग्रँड विटारावर 3 लाख रुपयांपेक्षा जास्त बचत करता येऊ शकते. यामध्ये झिरो रोड टॅक्स ऑफर, एक्सचेंज बोनस, लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट बोनसचा समावेश आहे.
Ans: फ्रॉन्क्सवर 27,100 रुपयांपर्यंत आणि XL6 वर 61,000 रुपयांपर्यंत बचत मिळू शकते. ऑफर्स व्हेरिएंट आणि डीलरनुसार बदलू शकतात.
Ans: ई विटारावर 30,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि मोफत होम चार्जर व इन्स्टॉलेशन मिळत आहे. एकूण बचत 50,000 रुपयांपेक्षा जास्त होऊ शकते.






