Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक वाहनांची मोठी तयारी! पाहा कोणत्या असतील या नव्या इलेक्ट्रिक एसयूव्ही ?

मारुती सुझुकी आपल्या 'e-Vitara' नंतर भारतीय बाजारात ईव्ही पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी अनेक नवीन इलेक्ट्रिक वाहने आणण्याच्या तयारीत आहे. यात e-Vitara पेक्षा स्वस्त आणि महागड्या कार्ससह मोठ्या कुटुंबांसाठी खास 'YMC' नावाच्या नवीन ३-रो इलेक्ट्रिक MPV चा समावेश आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 31, 2026 | 06:02 PM
मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक वाहनांची मोठी तयारी! पाहा कोणत्या असतील या नव्या इलेक्ट्रिक एसयूव्ही ?
Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकी भारतीय बाजारातील विविध बजेट आणि गरजांनुसार नवीन इलेक्ट्रिक गाड्या आणि एसयूव्ही पोर्टफोलिओ सादर करणार आहे.
  • कंपनी मोठ्या कुटुंबांना आकर्षित करण्यासाठी ‘YMC’ ही नवीन तीन-रांगांमधील इलेक्ट्रिक MPV कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.
  • मारुती सुझुकीचा एसयूव्ही मार्केट शेअर २० टक्क्यांहून अधिक झाला असून, प्रचंड मागणीमुळे कारखान्यांचे उत्पादन १०० टक्क्यांहून अधिक सुरू आहे.

इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये थोड्या विलंबाने प्रवेश केलं असला तरीही मारुती सुझुकी आता आपल्या ‘e-Vitara’ या पहिल्या इलेक्ट्रिक कारनंतर या क्षेत्रात मोठी मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. कंपनी भारतीय बाजारात जवळपास प्रत्येक पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये नवीन ईव्ही सादर करण्याची योजना आखत असून, सोबतच आपल्या एसयूव्ही पोर्टफोलिओला अधिक मजबूत करत आहे.

मारुती सुझुकीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात e-Vitara च्या वरच्या आणि खालील सेगमेंटमध्ये अनेक नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स लाँच केले जातील. एकाच सेगमेंटवर अवलंबून न राहता ग्राहकांना वेगवेगळ्या बजेटनुसार परवडणाऱ्या कार्सपासून ते प्रीमियम एसयूव्हीपर्यंतचे पर्याय उपलब्ध करून देणे, हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे.

Royal Enfield Shotgun 650 लिमिटेड एडिशनची अवघ्या 3 मिनिटांत सर्व विक्री; भारतातील सर्व 25 युनिट्स सोल्ड आउट!

तीन-रांगा असणारी नवीन इलेक्ट्रिक MPV येणार

कंपनीच्या ईव्ही पाइपलाइनमधील एक महत्त्वाचं मॉडेल म्हणजे ‘YMC’ ही ऑल-न्यू तीन-रांगांमधील इलेक्ट्रिक MPV. ही कार प्रामुख्याने मोठ्या कुटुंबांना लक्षात ठेवून तयार केली जात आहे. जरी या कारच्या बॅटरी, मोटर आणि रेंजबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, तरीही ही कार e-Vitara पेक्षा जास्त जागा शोधणाऱ्या ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरेल.

याशिवाय, e-Vitara पेक्षा स्वस्त आणि लहान ईव्ही सुद्धा लाँच केली जाऊ शकते. मारुतीने अद्याप या मॉडेलच्या नावाची पुष्टी केली नसली तरी, मध्यमवर्गीय ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक परवडणारी ईव्ही मारुतीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल.

एसयूव्ही सेगमेंटवर मारुतीची मजबूत पकड

मारुती सुझुकी केवळ ईव्हीपुरती मर्यादित न राहता देशातील सर्वात मोठी एसयूव्ही उत्पादक कंपनी बनण्याच्या दिशेने पावले टाकत आहे.

TVS Raider Super Squad Edition: डॉक्टर डूम प्रेरीत नवीन व्हेरियंट लाँच! जाणून घ्या सर्व माहिती

मार्केट शेअरमधील वाढ आणि प्रमुख मॉडेल्स

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये मारुतीचा एसयूव्ही मार्केट शेअर १२% होता, जो आता वाढून २०% पेक्षा जास्त झाला आहे. सध्या भारतातील एकूण कार विक्रीपैकी निम्म्याहून अधिक वाटा एसयूव्हीचा आहे. मारुतीची अद्ययावत Brezza, Grand Vitara आणि e-Vitara या रणनितीचा मुख्य भाग असतील.

उत्पादन क्षमतेचा पूर्ण वापर

सध्या मारुती सुझुकीच्या गाड्यांना बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे कंपनीचे सर्व कारखाने १००% पेक्षा जास्त क्षमतेने सुरू आहेत. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी अतिरिक्त दिवस काम करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या मारुतीसमोरील मुख्य आव्हान ग्राहकांची कमतरता नसून मागणीनुसार गाड्यांचे उत्पादन करणे हे आहे. भविष्यात उत्पादन क्षमता वाढल्यानंतर, मारुतीचा ईव्ही आणि एसयूव्ही पोर्टफोलिओ कंपनीच्या विक्रीला एका नव्या उंचीवर नेईल हे नक्की.

Web Title: Maruti suzuki plans ev offensive new electric suvs in pipeline auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • automobile
  • Electric Vehicles
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

थारप्रेमींसाठी क्रेझी बातमी! Mahindra Thar Facelift, Vision.S आणि BE.07 लवकरच येणार मार्केटमध्ये! पाहा डिटेलमध्ये माहिती
1

थारप्रेमींसाठी क्रेझी बातमी! Mahindra Thar Facelift, Vision.S आणि BE.07 लवकरच येणार मार्केटमध्ये! पाहा डिटेलमध्ये माहिती

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स
2

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम
3

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम

Royal Enfield Meteor 350 vs Triumph Tracker 400: किंमत, पॉवर आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?
4

Royal Enfield Meteor 350 vs Triumph Tracker 400: किंमत, पॉवर आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.