रॉयल एनफील्डने १५ जुलै २०२६ रोजी लाँच केलेल्या Shotgun 650 Limited Edition बाइकला भारतीय ग्राहकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. भारतीय बाजारासाठी निश्चित करण्यात आलेली सर्व २५ वाहने बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या ३ मिनिटांत सोल्ड आऊट झाली आहेत. ही बुकिंग प्रक्रिया रॉयल एनफील्डच्या अधिकृत अॅप आणि वेबसाइटवर पार पडली.
कंपनीने प्रसिद्ध ‘रफ क्राफ्ट्स’ कस्टम बिल्डरच्या सहकार्याने ही खास बाइक तयार केली आहे. जगभरात या व्हेरिएंटच्या फक्त १०० युनिट्सची विक्री केली जाणार असून, त्यापैकी २५ युनिट्स भारतीय बाजारासाठी राखीव ठेवण्यात आले होते. या बाइकची भारतातील एक्स-शोरूम किंमत ५.७५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
जागतिक स्तरावर प्रचंड उत्सुकता रॉयल एनफील्डने दिलेल्या माहितीनुसार, या १०० खास बाइक्स खरेदी करण्यासाठी जगभरातून ९,००० हून अधिक बाइकप्रेमींनी नोंदणी केली होती. या विक्रीत सहभागी होण्यासाठी ग्राहकांना १५ जुलै २०२६ ते ३० जुलै २०२६ दरम्यान कंपनीच्या अॅप किंवा वेबसाइटवरील ‘ड्रॉप झोन’मध्ये नोंदणी करणे कंपल्सरी करण्यात आले होते.
जगभरात टप्प्याटप्प्याने २७ ते ३० जुलै दरम्यान ही ऑनलाइन विक्री पार पडली,
‘कॅलिबर रॉयल’ या कस्टम मोटरसायकलवर आधारित असलेल्या या स्पेशल एडिशनचे उद्घाटन EICMA 2025 मध्ये करण्यात आले होते. त्यानंतर गोव्यात पार पडलेल्या ‘मोटोव्हर्स २०२५’ मध्येही ही बाइक प्रदर्शित करण्यात आली होती.
रॉयल एनफिल्डचा जलवा! पहिल्या तिमाहीत पुन्हा ओलांडला ३ लाख विक्रीचा टप्पा; 350cc बाईक्सचा दबदबा कायम
आकर्षक डिझाइन आणि प्रीमियम फीचर्स,
या बाइकच्या खरेदीदारांना ‘रफ क्राफ्ट्स’चे संस्थापक विन्स्टन येह यांची स्वाक्षरी असलेले आणि क्रमांकासह दिलेले ‘कॅलिबर रॉयल’चे गोल्ड-ऑन-ब्लॅक स्केच आर्टवर्क भेट म्हणून दिले जाणार आहे.






