फोटो सौजन्य: @volklub (X.com)
पहलगाम हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार आहे, अशी चर्चा रंगली आहे. अशातच भारत आणि पाकिस्तान यांची नेहमीच तुलना होताना दिसते. अनेकदा भारतात स्वस्तात विकली जाणारी वस्तू पाकिस्तानात महागड्या किमतीत विकली जाते. तसेच पाकिस्तानातील ऑटो इंडस्ट्रीमध्ये देखील महागाई पाहायला मिळते. आज आपण Maruti Suzuki Swift ची पाकिस्तानात किती किंमत आहे, त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
मारुती सुझुकी स्विफ्ट ही भारतात एक बजेट-फ्रेंडली हॅचबॅक कार म्हणून ओळखली जाते. भारतीय मार्केटमध्ये, त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटची किंमत सुमारे 9.64 लाख रुपयांपर्यंत जाते, पण आज आपण या कारची पाकिस्तानातील किंमत जाणून घेऊया.
‘या’ दिवशी Tata Altroz Facelift लाँच होण्याची शक्यता, होतील ‘हे’ मोठे बदल
पाकिस्तानमध्ये या कारच्या बेस व्हेरियंटची किंमत PKR 4,416,000 रुपये आहे, जी भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 13.42 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेल GLX CVT ची किंमत 4,719,000 रुपये म्हणजेच भारतीय रुपयांनुसार 14.33 लाख रुपये आहे. या किमतीत, भारतातील ग्राहक मारुती स्विफ्ट पेक्षा उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार खरेदी करतील.
पाकिस्तानमध्ये स्विफ्टसारख्या कारच्या किंमत जास्त आहे याचे कारण तेथील आर्थिक स्थिती खूपच कमकुवत आहे. पाकिस्तानात महागाई झपाट्याने वाढत आहे आणि पाकिस्तानी रुपया भारतीय चलनाच्या तुलनेत खूपच कमकुवत होत आहे. परिणामी, या सर्व कारणांमुळे, कारच्या किमती पाकिस्तानात तिप्पट होते, ज्यामुळे सामान्य माणसाला कार खरेदी करणे कठीण होते.
पाकिस्तानमध्ये उपलब्ध असलेली स्विफ्ट 1200 सीसी पेट्रोल इंजिनद्वारे चालते. त्यात मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 6 एअरबॅग्ज, ABS, EBD,व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल, रिव्हर्स कॅमेरा आणि रिअर पार्किंग सेन्सर समाविष्ट आहेत.
‘ही’ ऑटो कंपनी काय ऐकत नाही ! फक्त 5 वर्षात 15 लाख कार बनवत गाजवलंय मार्केट
भारतात उपलब्ध असलेल्या मारुती स्विफ्टमध्ये 1.2-लिटर 3-सिलेंडर झेड सिरीज इंजिन आहे. ही कार 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 9-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, 6-स्पीकर ऑडिओ सिस्टम आणि वायरलेस फोन चार्जिंग आहे. प्रवाशांच्या सेफ्टीसाठी, त्यात 6 एअरबॅग्ज, हिल-होल्ड असिस्ट, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, रियर कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.