फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र हे नेहमीच देश-विदेशातील ऑटो कंपन्यांना खुणावत असते. त्यामुळेच भारतात ऑटो क्षेत्रात विविध कंपन्या कार्यरत आहेत. यातीलच एक कंपनी म्हणजे किया मोटर्स. किया जरी विदेशी ऑटो कंपनी असली तरी कंपनीचे काही प्लांट भारतात आहेत, जे Made In India कार्सच्या उत्पादनावर भर देत असतात. एवढेच नव्हे तर या कार्स विदेशात निर्यात देखील केल्या जातात. नुकतेच किया एक इतिहास रचला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात एक नवा इतिहास रचत, Kia India ने अनंतपूर येथील त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमधून 15 लाख ‘मेक इन इंडिया’ कार्स तयार केल्या आहेत. या खास प्रसंगी लवकरच लाँच करण्यात येणारी कार म्हणजे किया कॅरेन्स. तसेच या 15 लाख कार्सच्या उत्पादनावरून समजते की भारतीय ग्राहकांमध्ये कियाच्या कार्सची किती क्रेझ आहे.
‘या’ 5 वैशिष्ट्यांमुळेच तर मार्केटमध्ये Audi A6 ठरत आहे खास, ग्राहकांचा मिळत आहे दमदार प्रतिसाद
या महत्त्वाच्या टप्प्याचे सेलिब्रेशन करताना, किया इंडियाने घोषणा केली आहे की ते येत्या 8 मे रोजी नवीन कॅरेन्स अधिकृतपणे झलक दाखवणार आहेत. नवीन कॅरेन्स सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक सुरक्षित आणि वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. यामुळे कियाच्या “फ्युचर-रेडी मोबिलिटी सोल्यूशन्स” च्या वचनाला आणखी बळकटी मिळेल.
या ऐतिहासिक क्षणाबद्दल आनंद व्यक्त करताना, किया इंडियाचे सीईओ ग्वांगगु ली (Gwanggu Lee)म्हणाले की, १५ ‘मेक इन इंडिया’ कार्सचे उत्पादन आमच्यासाठी अभिमानास्पद आणि भावनिक क्षण आहे. पहिल्या सेल्टोसपासून आजच्या कॅरेन्सपर्यंत, प्रत्येक वाहन आमच्या ग्राहकांच्या आणि भागीदारांच्या प्रेमाचे आणि पाठिंब्याचे साक्षर आहे. भविष्यासाठी आमचा संकल्प नाविन्याला प्रोत्साहन देण्याचा आहे.
Odysse Electric कडून भारतातील सर्वात स्वस्त स्पोर्ट्स बाईक लाँच, किंमत फक्त…
ऑगस्ट 2019 मध्ये किया इंडियाने सेल्टोस लाँच करून भारतीय मार्केटमध्ये एंट्री केली होती. तेव्हापासून कंपनीने मागे वळून पाहिले नाही. आज कियाच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक वेगवेगळ्या विभागातील वाहने समाविष्ट आहेत. जसे की सोनेट, कॅरेन्स, कार्निव्हल आणि अलीकडेच B2-SUV सायरोस लाँच झाली होती.
सेल्टोस: 7,00,668 युनिट्स (46.7%)
सोनेट: 5,19,064 युनिट्स (34.6%)
कॅरेन्स: 2,41,582 युनिट्स (16.1%)
सायरोस: 23,036 युनिट्स (1.5%)
कार्निव्हल: 16,172 युनिट्स (1.1%)
या आकडेवारीवरून असे दिसून येते की कियाच्या सर्व मॉडेल्सना भारतीय ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.