फोटो सौजन्य: X.com
काही दिवसांपूर्वी भारतीय मार्केटमध्ये मारुती सुझुकीने त्यांची नवीन एसयूव्ही SUV Victoris लाँच केली आहे. कंपनीने या कारचा लूक अगदी फ्यूचरिस्टिक ठेवला आहे. ही नवीन एसयूव्ही लाँच झाल्याने Grand Vitara ला थेट आव्हान मिळणार आहे. अशातच ग्राहकांमध्ये या दोन्ही एसयूव्हींपैकी कोणती कार खरेदी करावी याबाबत गोंधळ होणार हे नक्की.
अलीकडेच मारुती सुझुकीने त्यांची नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही Victoris सादर केली आहे. ही एसयूव्ही कंपनीच्या लोकप्रिय ग्रँड विटारावर आधारित आहे, परंतु फीचर्सच्या बाबतीत, व्हिक्टोरिसने ग्रँड विटाराला खूप मागे टाकले आहे. नवीन डिझाइन, हाय-टेक फीचर्स आणि मजबूत हायब्रिड इंजिनसह, व्हिक्टोरिस कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ग्राहकांची पहिली पसंती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. चला जाणून घेऊया या कारच्या अशा 10 प्रीमियम फीचर्सबद्दल, ज्यांच्यासमोर ग्रँड विटारा मागे पडली आहे.
व्हेंटिलेटेड सीट्स आणि प्रीमियम फीचर्सने सुसज्ज अशी Citroen Basalt X भारतात लाँच
ADAS फीचर्स: Victoris मध्ये Level-2 ADAS दिले आहे, ज्यात ऑटोमॅटिक ब्रेकिंग, ॲडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि लेन कीप असिस्ट यांसारखे फीचर्स आहेत. Grand Vitara मध्ये हे फीचर्स नाहीत.
ड्रायव्हर डिस्प्ले: Victoris मध्ये 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आहे, तर Grand Vitara मध्ये 7-इंच डिस्प्ले दिला आहे.
इन्फोटेन्मेंट स्क्रीन: Victoris मध्ये 10.1-इंच टचस्क्रीन सिस्टम आहे, तर Grand Vitara मध्ये 9-इंच स्क्रीन दिली आहे.
साउंड सिस्टम: Victoris मध्ये 8 स्पीकर्स, सबवूफर आणि Dolby Atmos सपोर्ट दिला आहे, तर Grand Vitara मध्ये फक्त 6 स्पीकर्स दिले आहेत.
Yamaha R15 मध्ये मोठा अपडेट, पहिल्यांदाच भारतात पाहायला मिळणार…
ॲम्बियंट लायटिंग: Victoris मध्ये 64-कलर ॲम्बियंट लायटिंग दिली आहे, ज्यामुळे केबिन अधिक प्रीमियम दिसतो. Grand Vitara मध्ये हा फीचर उपलब्ध नाही.
पावर्ड टेलगेट: Victoris मध्ये टेलगेट जेस्चर कंट्रोलने उघडता येतो, पण Grand Vitara मध्ये फक्त मॅन्युअल टेलगेट आहे.
CNG टाकी डिझाइन: Victoris मध्ये अंडरबॉडी CNG टाकी दिली आहे, ज्यामुळे बूट स्पेस जास्त मिळतो. Grand Vitara मध्ये बूट स्पेस कमी होतो.
सेफ्टी रेटिंग: Victoris ला आधीच BNCAP कडून 5-स्टार रेटिंग मिळाले आहे, तर Grand Vitara ला हे रेटिंग मिळालेले नाही.
मायलेज: Victoris चा Strong Hybrid 28.65 kmpl मायलेज देतो, तर Grand Vitara 27.97 kmpl मायलेज देते.
Alexa कनेक्ट: Victoris मध्ये Alexa Auto व्हॉईस असिस्टंट दिला आहे, ज्यामुळे व्हॉईस कमांडद्वारे नेव्हिगेशन, कॉल आणि इतर अनेक फंक्शन्स कंट्रोल करता येतात.