Yamaha R15 मध्ये मोठा अपडेट (फोटो सौजन्य: iStock)
भारतीय बाजारात अनेक उत्तम दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत. ज्यांनी ग्राहकांच्या अपेक्षेनुसार दमदार बाईक आणि स्कूटर ऑफर केल्या आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे यामाहा. ही कंपनी आपल्या हाय परफॉर्मन्स आणि स्टायलिश बाईकसाठी ओळखली जाते. तरुणांमध्ये तर कंपनीच्या बाईकची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. आता कंपनीने त्यांची बाईक Yamaha R15 चार नवीन रंगांसह अपडेट केली आहे.
यामाहाने त्यांची लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक Yamaha R15 अपडेट केली आहे. कंपनीने ही बाईक आकर्षक नवीन रंग आणि ग्राफिक्ससह अपडेट केली आहे. या अपडेटमुळे भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एंट्री-लेव्हल सुपरस्पोर्ट बाईकची विक्री आणखी वाढेल. Yamaha R15 कोणत्या खास फीचर्ससह ऑफर केली आहे.
एकदाची Tesla कारची झाली डिलिव्हरी ! ‘या’ मंत्र्याच्या हातात पडली पहिल्या Model Y ची चावी
R15 सिरीजमध्ये R15M, R15 व्हर्जन 4 आणि R15S समाविष्ट आहेत. या सर्व बाईक नवीन रंग आणि ग्राफिक्ससह अपडेट केले गेले आहेत. ही बाईक मेटॅलिक ग्रे रंगात अपडेट केले गेले आहे, जे त्याच्या स्पोर्टी स्टाइलिंगसह प्रीमियम लूक देते. R15 आवृत्ती 4 मध्ये दोन प्रमुख अपडेट्स आहेत, जे बोल्ड मेटॅलिक ब्लॅकसह रिफ्रेश केलेले रेसिंग ब्लू रंग आणि नवीन ग्राफिक्स आहेत.
मेटॅलिक ग्रे कलर यामाहाच्या R-सीरीजसाठी ग्लोबल लेव्हलवर खूप पॉप्युलर आहे आणि हा कलर भारतात पहिल्यांदाच सादर करण्यात आला आहे. यामधील R15S ला vermillion wheels सोबत नवा मॅट ब्लॅक फिनिश देण्यात आला आहे, जो त्याच्या स्ट्रीट-केंद्रित स्टाईलला आणखी उठावदार बनवतो.
दमदार इंजिन, आधुनिक फीचर्ससह TVS NTorq 150 भारतीय बाजारपेठेत लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
R15 सीरिजमधील सर्व व्हेरिएंट्स 155cc लिक्विड-कूल्ड, फ्युएल-इंजेक्टेड इंजिनसह उपलब्ध आहेत. यात व्हेरेबल व्हॉल्व्ह ॲक्च्युएशन (VVA) तंत्रज्ञान देण्यात आले आहे. डेल्टाबॉक्स फ्रेम आणि डायसिल सिलिंडरच्या कॉम्बिनेशनमुळे हा बाईक सेगमेंटमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि जबरदस्त हँडलिंग प्रदान करतो. यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS), असिस्ट आणि स्लिपर क्लच, क्विक शिफ्टर (निवडक व्हेरिएंट्समध्ये), अपसाइड-डाउन फ्रंट फोर्क आणि लिंक्ड-टाईप मोनोक्रॉस सस्पेंशन यांसारखे अत्याधुनिक फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
भारतात, यामाहा R15 तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे – R15S ची किंमत 1.68 लाख रुपये (एक्स-शोरूम), R15 व्हर्जन 4 ची किंमत 1.85 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि R15M व्हर्जनची किंमत 2.01 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.