फोटो सौजन्य: iStock
भारताच्या प्रमुख वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या Maruti Suzuki कडून अनेक सेगमेंटमध्ये वाहने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातात. कंपनीची Maruti Wagon R ही हॅचबॅक सेगमेंटमधील लोकप्रिय आणि नंबर 1 कार आहे. जर तुम्ही याचा CNG व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दरमहा किती EMI भरावा लागेल, त्याबद्दल जाणून घेऊयात.
MG Motors च्या ‘या’ Cars वर मिळतेय धमाकेदार डिस्काउंट! लाखो रुपयांची होईल बचत
मारुती सुझुकीकडून Wagon R चा CNG व्हेरिएंटही विक्रीसाठी उपलब्ध आहे. या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 5.89 लाख रुपये आहे. जर ही कार खरेदी केली, तर जवळपास 24 हजार रुपये नोंदणी शुल्क, सुमारे 24 हजार रुपये विमा आणि फास्टॅगसाठी 600 रुपये द्यावे लागतात. त्यामुळे या कारची ऑन-रोड किंमत सुमारे 6.43 लाख रुपये होते.
जर तुम्ही Maruti Wagon R चा CNG व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून साधारणपणे एक्स-शोरूम किंमतीवरच कर्ज दिले जाते. अशा परिस्थितीत 1 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जवळपास 5.43 लाख रुपये कर्ज घ्यावे लागेल. जर बँकेने हे कर्ज 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी मंजूर केले, तर तुम्हाला दरमहा सुमारे 8,740 रुपये EMI भरावा लागेल.
2 लाखांचं डाउन पेमेंट आणि ‘ही’ Automatic Car दारात उभी राहिलीच म्हणून समजा! 7 वर्षांसाठी EMI फक्त…
जर तुम्ही 5.43 लाख रुपयांचे कार लोन 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी घेतले, तर पुढील सात वर्षे दरमहा 8,740 रुपये EMI द्यावी लागेल. अशा प्रकारे सात वर्षांत तुम्ही जवळपास 1.90 लाख रुपये व्याज भराल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून या कारची एकूण किंमत सुमारे 8.3 लाख रुपये इतकी पडेल.
Maruti Suzuki कडून Wagon R ही एंट्री-लेव्हल हॅचबॅक सेगमेंटमध्ये ऑफर केली जाते. या सेगमेंटमध्ये या कारची थेट स्पर्धा Celerio तसेच Renault Kwid, Maruti Alto K10, S-Presso, Tata Tiago आणि Hyundai Grand i10 Nios यांसारख्या कार्सशी होते.






