फोटो सौजन्य: iStock
एमजीची Astor ही मिड-साइज SUV सेगमेंटमधील लोकप्रिय कार आहे. या महिन्यात ही SUV खरेदी केल्यास ग्राहकांना कमाल 85 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळू शकतो. या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे.
टर्बो हायब्रीड इंजिन, 1030 हॉर्सपॉवर अन् 10 कोटींची किंमत; भारतात Ferrari ची नवी सुपरकार सादर
एमजीची Hector ही मिड-साइज SUV भारतात मोठ्या प्रमाणात पसंत केली जाते. या महिन्यात Hector खरेदी केल्यास जुन्या व्हर्जनवर कमाल 1.65 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तर नव्या व्हर्जनवर कमाल 1.10 लाख रुपयांपर्यंत बचतीची संधी कंपनी देत आहे.
MG कडून इलेक्ट्रिक SUV म्हणून ZS EV ची विक्रीही केली जाते. या महिन्यात ही इलेक्ट्रिक SUV खरेदी केल्यास कमाल 80 हजार रुपयांपर्यंत ऑफरचा लाभ मिळू शकतो. या ऑफरमध्ये रिटेल इन्सेंटिव्ह आणि इतर फायदे समाविष्ट आहेत.
एमजी मोटरची Gloster ही फुल-साइज SUV सेगमेंटमधील गाडी आहे. या महिन्यात जर ही SUV खरेदी केली, तर सर्वाधिक बचत याच मॉडेलवर मिळू शकते. कंपनीकडून कमाल 3.70 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे.
आमचा देखील एक काळ होता! भारतीय रस्त्यांवर राज्य करणाऱ्या ‘या’ 4 Diesel Cars अचानक का झाल्या गायब?
MG Comet ही देशातील परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारपैकी एक मानली जाते. तसेच ही कार ग्राहकांची आवडती कार ठरली आहे. या महिन्यात ही कार खरेदी केल्यास ग्राहकांना कमाल 50 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळत आहे.






