
'ही' आहे देशातील पहिली गिअरबॉक्स असणारी E Bike
Matter Era 5000 Plus चे डिझाइन पूर्णपणे आधुनिक आणि फ्युचरिस्टिक आहे. फ्रंटला प्रोजेक्टर LED हेडलॅम्प आणि LED DRLs देण्यात आले असून, यामुळे बाईकलाही शार्प आणि आक्रमक लुक मिळतो. अँगल्ड बॉडी पॅनल्समुळे ही बाइक उभी असतानाही स्पोर्टी दिसते.
फक्त काहीच दिवस उरले! ‘या’ दिवशी Tata Sierra ची डिलिव्हरी थेट तुमच्या घरी होणार
साइड प्रोफाइलमध्ये फ्यूल टँकसारखा दिसणारा भाग प्रत्यक्षात बॅटरी कव्हर करतो, तर त्याखाली पॉवरट्रेन बसवण्यात आले आहे. स्प्लिट सीट सेटअप, अलॉय व्हील्स आणि टेपर्ड टेल सेक्शन या डिझाइनला पूर्णत्व देतात.
या इलेक्ट्रिक बाईकचे एक मोठे आकर्षण म्हणजे तिचा 7-इंच TFT टचस्क्रीन डिस्प्ले. हा डिस्प्ले केवळ आकाराने मोठा नाही, तर फीचर्सच्या बाबतीतही अत्यंत प्रगत आहे. याच स्क्रीनवर रायडरला स्पीड, बॅटरी लेव्हल, ट्रिप डिटेल्स आणि राइडशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळते. डिस्प्लेची पोजिशनिंग अशी ठेवण्यात आली आहे की, राइडिंगदरम्यान माहिती सहज पाहता येते आणि रस्त्याकडून लक्ष विचलित होत नाही.
हा डिस्प्ले केवळ इन्स्ट्रुमेंट क्लस्टरपुरता मर्यादित नसून, यामध्ये रायडर प्रोफाइल, स्मार्टफोन नोटिफिकेशन्स, तसेच MapMyIndia च्या माध्यमातून नेव्हिगेशनची सुविधाही देण्यात आली आहे. रायडरला आपल्या गरजेनुसार स्क्रीन लेआउट आणि फीचर्स कस्टमाइज करता येतात, त्यामुळे ही बाईक तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रीमियम वाटते.
एक काळ गाजवणाऱ्या Ola Electric ला धाब्यावर बसवत ‘या’ कंपन्यांनी मारली बाजी, जाणून घ्या सेल्स रिपोर्ट
Matter Era 5000 Plus मध्ये 5 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, ती इन-बिल्ट लिक्विड-कूलिंग सिस्टीमसह येते. इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये लिक्विड कूलिंग अजूनही क्वचित पाहायला मिळते, त्यामुळे हे फीचर तांत्रिकदृष्ट्या या बाईकलाच अधिक मजबूत बनवते.
लिक्विड कूलिंगमुळे बॅटरी आणि मोटरवर जास्त ताण असतानाही थर्मल मॅनेजमेंट चांगले राहते. या बाईकलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 4-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स. 10.5 kW क्षमतेचा परमनंट मॅग्नेट मोटर या गिअरबॉक्सशी जोडण्यात आला आहे.
बहुतेक इलेक्ट्रिक बाईक्स सिंगल-स्पीड ट्रान्समिशनसह येतात, मात्र येथे गिअरबॉक्समुळे रायडरला अधिक कंट्रोल आणि इंजिन ब्रेकिंगसारखा अनुभव मिळतो.
Matter Era 5000 Plus मध्ये Eco, City आणि Sport असे तीन राइडिंग मोड्स देण्यात आले आहेत. Sport मोडमध्ये या बाईकची टॉप स्पीड सुमारे 105 kmph असल्याचे सांगितले जाते. तसेच 0 ते 60 kmph स्पीड गाठण्यासाठी ही बाईक साधारण 6 सेकंद घेते. हे आकडे दर्शवतात की ही बाइक केवळ शहरापुरती मर्यादित नसून, हायवे राइडिंगसाठीही सक्षम आहे.
या बाईकमध्ये फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि रिअरला ट्विन गॅस-चार्ज्ड शॉक अॅब्झॉर्बर्स देण्यात आले आहेत. सिटी राइडिंगमध्ये फ्रंट सस्पेन्शन संतुलित वाटते, तर रिअर सस्पेन्शन थोडे कडक भासू शकते. रोजच्या वापरासाठी ब्रेकिंग सेटअप पुरेसा असल्याचे सांगितले जाते, मात्र काही रायडर्सना फ्रंट ब्रेकमध्ये अधिक प्रोग्रेसिव फीलची अपेक्षा असू शकते.
Matter Era 5000 Plus ची ex-showroom किंमत 1.84 लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. याच लाइन-अपमध्ये आणखी एक व्हेरिएंट उपलब्ध असून, त्यामध्ये काही फीचर्स कमी असले तरी पॉवरट्रेन समान आहे. किमतीच्या दृष्टीने ही बाईक प्रीमियम इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये स्थान मिळवते.