फोटो सौजन्य: Gemini
भारताचा इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजार Calendar Year 2025 मध्ये मजबुतीसह बंद झाला आहे. रिटेल विक्रीच्या आकडेवारीनुसार या कालावधीत एकूण 12.8 लाख युनिट्सची विक्री नोंदवण्यात आली, तर Calendar Year 2024 मध्ये ही विक्री 11.49 लाख युनिट्स इतकी होती. म्हणजेच वार्षिक पातळीवर बाजारात 11.36 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
30 KM ची मायलेज देणाऱ्या ‘या’ कारसमोर Nexon-Scorpio नेहमीच होतात फेल! किंमत 5.99 लाख रुपये
Calendar Year 2025 मध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये TVS Motor Company ने आघाडी घेतली. कंपनीने वर्षभरात 2,98,881 युनिट्सची विक्री केली असून, ही विक्री Calendar Year 2024 च्या तुलनेत 35.35% अधिक आहे.
दुसऱ्या क्रमांकावर Bajaj Auto राहिली. Bajaj ने 2,69,847 युनिट्सची विक्री करत 39.34 टक्क्यांची YoY वाढ नोंदवली. TVS आणि Bajaj या दोन्ही कंपन्यांची मजबूत कामगिरी यावरून ग्राहकांचा विश्वास आता अशा ब्रँड्सकडे वळत असल्याचे दिसते, ज्यांचे सर्व्हिस नेटवर्क, प्रोडक्ट रिलायबिलिटी आणि ब्रँड व्हॅल्यू आधीपासूनच भक्कम आहे.
Calendar Year 2025 मध्ये Ather Energy साठी हे वर्ष आतापर्यंतच्या सर्वोत्तम वर्षांपैकी एक ठरले. कंपनीने 2,00,797 युनिट्सची विक्री केली असून, ही 58.91 टक्क्यांची YoY वाढ दर्शवते. ही वाढ प्रामुख्याने 450 आणि Rizta रेंजला मिळालेल्या मजबूत मागणीमुळे झाली आहे.
Tata Motors ची सर्वात किफायतशीर कार! फक्त 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI दहा हजारांपेक्षा कमी
मात्र याउलट, Ola Electric साठी 2025 हे वर्ष आव्हानात्मक ठरले. कंपनीची विक्री Calendar Year 2024 मधील 4,07,700 युनिट्सवरून घटून 1,99,318 युनिट्सवर आली आहे. म्हणजेच वार्षिक आधारावर तब्बल 51.11 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. ही घट वाढती स्पर्धा आणि बदलत्या ग्राहक पसंतीकडे स्पष्टपणे इशारा करते.
स्रोत: हा रिटेल सेल्स डेटा FADA रिसर्चकडून घेण्यात आला आहे. डेटामध्ये तेलंगणा राज्याचा समावेश नाही. वाहन रिटेल डेटा 03.01.26 रोजीचा आहे, जो भारत सरकारच्या MoRTH च्या सहकार्याने 1,459 पैकी 1,401 RTOs मधून मिळवला आहे.






