फोटो सौजन्य: Pinterest
Tata Sierra लाँच होताच ठरली ग्राहकांची आवडती एसयूव्ही
पहिल्याच दिवशी 70 हजाराहून अधिक ग्राहकांनी बुक केली एसयूव्ही
जाणून घ्या कधी मिळणार कारची डिलिव्हरी
ऑटो बाजारात SUV वाहनांना नेहमीच ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नुकतेच या सेगमेंटमध्ये Tata Motors ने त्यांची क्लासिक कार Tata Sierra एका नवीन अवतारात सादर केली. जेव्हा टाटाने या कारला लाँच केले तेव्हा एक वेगळीच क्रेझ या कारबाबत निर्माण झाली. म्हणूनच तर या कारला पहिल्याच दिवशी 70,000 पेक्षा जास्त बुकिंग्स मिळाल्या. मात्र, आता ग्राहक या कारची डिलिव्हरी कधी होणार याच्या प्रतीक्षेत आहेत.
Tata Sierra ची डिलिव्हरी येत्या 15 January पासून सुरू होणार आहे. गुजरातमधील टाटाच्या सानंद प्लांटमध्ये सध्या या कारचे उत्पादन वेगाने सुरू आहे. Tata Sierra ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपयांइतकी ठेवण्यात आली आहे.
टाटा मोटर्सने सिएराचे सर्व व्हेरिएंट्स बाजारात सादर केले आहेत. ही नवी SUV Smart Plus, Pure, Pure Plus, Adventure, Adventure Plus, Accomplished आणि Accomplished Plus या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एक काळ गाजवणाऱ्या Ola Electric ला धाब्यावर बसवत ‘या’ कंपन्यांनी मारली बाजी, जाणून घ्या सेल्स रिपोर्ट
Smart Plus हा सिएराचा बेस व्हेरिएंट असून त्यामध्ये 1.5-लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन आणि मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. या व्हेरिएंटची एक्स- शोरूम किंमत 11.49 लाख रुपये आहे. तर 1.5-लीटर Kryojet डिझेल इंजिनसह येणाऱ्या बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपयांइतकी आहे.
Pure व्हेरिएंट्सची एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपयांपासून सुरू होऊन 15.99 लाखांपर्यंत आहे. तर Pure Plus व्हेरिएंटची किंमत 14.49 लाख रुपयांपासून सुरू होऊन 17.49 लाखांपर्यंत जाते.
Adventure मॉडेलचे एकूण तीन व्हेरिएंट्स बाजारात आणण्यात आले असून, त्यांची एक्स-शोरूम किंमत 15.29 लाख पासून 16.79 लाख पर्यंत आहे. Adventure Plus चे चार व्हेरिएंट्स उपलब्ध असून, त्यांची किंमत 15.99 लाखांपासून सुरू होऊन 18.49 लाखांपर्यंत जाते.
तसेच Accomplished मॉडेलचे चार व्हेरिएंट्स आणि Accomplished प्लसचे तीन व्हेरिएंट्स बाजारात दाखल झाले आहेत. मात्र, या टॉप व्हेरिएंट्सच्या किमतींबाबत टाटा मोटर्सने अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.






