
फोटो सौजन्य: Pinterest
एमजीकडून सायबरस्टर Irises Cyan ही नव्या रंगात ऑफर करण्यात आली आहे. यासोबतच ही कार ड्युअल-टोन रंगांच्या निवडक पर्यायांमध्येही उपलब्ध आहे. यामध्ये हाय-एनर्जी न्यूक्लियर येलो आणि फ्लेअर रेड हे रंग कॉन्ट्रास्टिंग ब्लॅक रूफसह, तर अँडीज ग्रे आणि मॉडर्न बेज हे रंग लाल रूफसह देण्यात आले आहेत.
Maruti, Tata, आणि Mahindra ला ‘या’ कारने आणलं टेन्शनमध्ये! तब्बल 5 लाख युनिट्सची केली विक्री
JSW MG Select चे मिलिंद शाह यांनी सांगितले की, एमजी सायबरस्टरसाठी दिलेला आयरिस सियान रंग हा केवळ रंगाचा पर्याय नाही, तर तो आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. हा रंग कारचा प्रगत स्वभाव दाखवतो आणि तिच्या परफॉर्मन्स-केंद्रित डीएनएशी पूर्णपणे सुसंगत आहे.
एमजीच्या या इलेक्ट्रिक सुपरकारमध्ये 77 kWh क्षमतेची दमदार बॅटरी आणि पॉवरफुल मोटर देण्यात आली आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार सुमारे 507 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. 144 kW फास्ट चार्जरच्या मदतीने बॅटरी केवळ 38 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करता येते. मोटरमधून या कारला 510 पीएस पॉवर आणि 725 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. याचा टॉप स्पीड 195 किमी प्रतितास इतका आहे. यामध्ये रिअर व्हील ड्राइव्ह तसेच ऑल व्हील ड्राइव्हचे पर्यायही उपलब्ध आहेत.
या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 10.25 इंच वर्च्युअल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 7 इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, 7 इंच ड्रायव्हर टचस्क्रीन, बोस साउंड सिस्टीम, Y-शेप स्पोर्ट्स सीट्स, 19 व 20 इंच अलॉय व्हील्स, फुली इलेक्ट्रिक हुड, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले यांसारख्या आधुनिक सुविधा मिळतात.
फक्त 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Wagon R थेट तुमच्या दारात उभी! जाणून घ्या Down Payment आणि EMI
एमजी मोटर्सकडून MG Cyberster ही कार भारतीय बाजारात 74.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत ऑफर करण्यात येते.