Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नादखुळा ! MG Motor ची नवी SUV MG Majestor गाडी लाँच; देशातल्या टॉप गाड्यांना देणार टक्कर

MG Motor New SUV Launch : ऑटोमोबाईलच्या क्षेत्रात आता आणखी एका नव्या गाडीची भारतीय बाजारपेठात एन्ट्री झाली आहे. MG Motor चं नाव ऑटोमोबाईलच्या दुनियेत टॉप लेव्हल आहे. अशातचा आता या कंपनीने नवी गाडी लाँच केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 26, 2026 | 02:03 PM
SUV MG Majestor

SUV MG Majestor

Follow Us
Follow Us:

MG Motor ची नवी SUV MG Majestor गाडी लाँच

देशातल्या टॉप गाड्यांना देणार टक्कर

ऑटोमोबाईलच्या क्षेत्रात आता आणखी एका नव्या गाडीची भारतीय बाजारपेठात एन्ट्री झाली आहे. MG Motor चं नाव ऑटोमोबाईलच्या दुनियेत टॉप लेव्हल आहे. अशातचा आता या कंपनीने नवी गाडी लाँच केली आहे. MG Motor ने आपल्या नवीन फ्लॅगशिप SUV MG Majestor चे उत्पादन गुजरातमधील हलोल प्लांटमध्ये सुरू केले आहे. या SUV साठी प्री-बुकिंगला देखील सुरुवात झाली असून बुकिंग रक्कम 41 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. Gloucesterची जागा घेणारी Majestor ही MG ची नवीन फ्लॅगशिप पेट्रोल-डिझेल SUV असेल. ही SUV Sharp आणि Savvy अशा दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे.

एक्स-शोरूम किंमत अंदाजे 40 लाख ते 45 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते असं म्हटलं जात आहे. भारतीय बाजारात तिची स्पर्धा Toyota Fortuner, Jeep Meridian आणि Skoda Kodiaq यांच्याशी होणार आहे.

Ferrari ची पहिलीच इलेक्ट्रिक कार फसली वादात, कसे आहेत कारचे फिचर्स आणि काय आहे Range

दमदार इंजिन आणि ऑफ-रोड क्षमता

MG Majestor मध्ये ग्लॉस्टरमधील 2.0 लिटर ट्विन-टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 215hp पॉवर आणि 478.5Nm टॉर्क निर्माण करते.
यासोबत 8-स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि 4WD (फोर-व्हील ड्राइव्ह) सिस्टम मिळते.

SUV मध्ये लो-रेंज ट्रान्सफर केससह तीन लॉकिंग डिफरेंशियल्स आणि Snow, Rock, Sand, Mud व Normal असे विविध ड्रायव्हिंग मोड्स दिले आहेत, ज्यामुळे ऑफ-रोड ड्रायव्हिंग अधिक सक्षम बनते.

दमदार आणि आकर्षक डिझाइन

MG Majestor ला बॉक्सी आणि मस्क्युलर लूक देण्यात आला आहे. समोर मोठी ग्लॉस-ब्लॅक ग्रिल, उभ्या रचनेतील LED हेडलॅम्प्स आणि स्लिक LED DRLs पाहायला मिळतात. बंपरला रग्ड क्लॅडिंग आणि सिल्व्हर स्किड प्लेट देण्यात आली आहे.

SUV मध्ये 19-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, साइड स्टेप्स आणि रुंद व्हील आर्चेस दिले आहेत.

त्याचबरोबर मागच्या बाजूला कनेक्टेड LED टेल-लाईट्स आणि Morris Garages ब्रँडिंग देण्यात आले आहे. तसेच ड्युअल एग्झॉस्ट टिप्समुळे SUV ला अधिक आक्रमक लूक मिळतो.

India Cheapest Car : कार खरेदीचा प्लॅन असेल तर घाई करा! 32Km मायलेज, किंमत फक्त ₹3.50 लाख; पण जूनपासून ‘या’ स्वस्त कार महागणार

फीचर-लोडेड प्रीमियम इंटिरिअर

MG Majestor च्या केबिनमध्ये ब्लॅक थीमसोबत सिल्व्हर फिनिशचा वापर करण्यात आला आहे.
डॅशबोर्डवर 12.4-इंचाच्या दोन स्क्रीन एक इन्फोटेनमेंटसाठी आणि दुसरी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी दिल्या आहेत.ही SUV 6-सीटर आणि 7-सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. लेदरेट अपहोल्स्ट्री स्टँडर्ड मिळणार आहे.

इतर फीचर्समध्ये पॅनोरॅमिक सनरूफ,12-स्पीकर JBL Studio साउंड सिस्टम, पॉवर्ड टेलगेट, 3-झोन क्लायमेट कंट्रोल, मागील प्रवाशांसाठी 220V पॉवर आउटलेट आणि ड्युअल वायरलेस फोन चार्जरचा समावेश आहे.

याशिवाय 12-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, मेमरी फंक्शन, व्हेंटिलेटेड आणि मसाज फ्रंट सीट्स, 8-वे पॉवर्ड को-ड्रायव्हर सीट आणि 64-कलर अ‍ॅम्बियंट लाइटिंगसारखे प्रीमियम फीचर्सही मिळतात.सुरक्षा फीचर्समध्ये ADAS सह अनेक आधुनिक सुविधा

सुरक्षेसाठी MG Majestor मध्ये 6 एअरबॅग्स, लेव्हल-2 ADAS, 360-डिग्री कॅमेरा, ऑटो-डिमिंग IRVM, हिल-होल्ड आणि हिल-डिसेंट कंट्रोल, TPMS आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक यांसारखी आधुनिक सुरक्षा साधने देण्यात आली आहेत.MG Majestor च्या भारतातील लॉन्च तारखेची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

Web Title: Mg motor launches new suv mg majestor will compete with top cars in the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • automobile news marathi
  • Mg motors car
  • navarashtra news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.