(फोटो सौजन्य-AI एआय)
9 कलर ऑप्शनसह क्लासिक 350
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 सध्या एकूण 9 कलर ऑप्शनमध्ये अव्हेलेबल आहे. यात Redditch Red, Madras Red, Medallion Bronze, Commando Sand, Gorkha Green, Gun Grey, Stealth Black, Emerald Green आणि Signature White यांचा समावेश आहे. त्यामुळे या सेगमेंटमध्ये रंगांच्या बाबतीत क्लासिक 350 कडे मोठी निवड मिळते.
अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?
यावर्षी मिळाले जास्त फीचर्स
रॉयल एनफिल्डने जुलै 2026 मध्ये क्लासिक 350 ला अपडेट केले होते. त्यावेळी ड्युअल-चॅनल ABS व्हेरिएंट्समध्ये Assist आणि Slipper Clutch तसेच USB Type-C Fast Charging पोर्ट स्टँडर्ड करण्यात आले. Assist आणि Slipper Clutch मुळे गिअर बदलताना राइडिंग जास्त स्मूथ होते आणि शहरातील ट्रॅफिकमध्ये क्लच वापरणेही तुलनेने सोपे होते. USB Type-C पोर्टमुळे प्रवासादरम्यान स्मार्टफोन चार्ज करता येतो.
इंजिन आणि राइडिंग हार्डवेअर
क्लासिक 350 मध्ये 349cc सिंगल-सिलेंडर एअर/ऑईल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6,100rpm वर 20.2bhp पॉवर आणि 4,000rpm वर 27Nm टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये 13 लिटरचा फ्युल टँक असून ग्राउंड क्लीयरन्स 170mm आहे. ट्विन डाउनट्यूब स्पाइन फ्रेमवर आधारित या बाईकमध्ये रॉयल एनफिल्डचे Tripper Pod देखील मिळते. याच्या मदतीने रॉयल एनफिल्ड अॅप आणि Google Maps द्वारे नेव्हिगेशन करता येते.
रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर
क्लासिक 350 ची विक्री का महत्त्वाची?
क्लासिक 350 ही रॉयल एनफिल्डची भारतातील सर्वाधिक विक्री होणारी मोटरसायकल आहे. या बाईकची सरासरी मासिक विक्री 30,000 युनिट्सपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे किंमत वाढली असली तरी रेट्रो लूक, दमदार रोड प्रेझेन्स आणि रोजच्या वापरासोबत लाँग राइडसाठी योग्य सेटअप यामुळे क्लासिक 350 ची फेम कायम राहण्याची शक्यता आहे.






