फोटो सौजन्य: Pinterest
टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV Tata Nexon.ev ला अधिक आकर्षक बनवण्यासाठी दोन नवीन ड्युअल-टोन एक्सटिरिअर रंग सादर केले आहेत. आता Nexon.ev 45 व्हेरिएंट Pure Grey आणि Ocean Blue या नव्या रंगांमध्ये उपलब्ध झाला आहे. या अपडेटमुळे इलेक्ट्रिक SUV खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिक रंग पर्याय मिळणार आहेत. Tata Nexon.ev ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये असून ही इलेक्ट्रिक SUV थेट Mahindra XUV400 ला टक्कर देते.
नवे Pure Grey आणि Ocean Blue रंग Nexon.ev 45 च्या Creative, Fearless आणि Empowered या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असतील. Fearless आणि Empowered व्हेरिएंटमध्ये ब्लॅक रूफ, तर Creative व्हेरिएंटमध्ये व्हाइट रूफ देण्यात आले आहे. आधीपासून उपलब्ध असलेल्या रंगांमध्ये Pristine White, Daytona Grey आणि Empowered Oxide यांचा समावेश आहे. हे नवे रंग फक्त 45 kWh बॅटरी पॅक असलेल्या मॉडेलसाठी उपलब्ध असून 30 kWh व्हेरिएंटमध्ये मिळणार नाहीत.
Tata Nexon.ev 45 मध्ये 46.08 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, MIDC मानकांनुसार ही इलेक्ट्रिक SUV सुमारे 489 किमीची रेंज देण्याचा दावा करते. ही SUV 144 bhp पॉवर आणि 215 Nm टॉर्क निर्माण करते. परफॉर्मन्सच्या बाबतीत Nexon.ev फक्त 8.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठते.
दमदार फीचर्ससह Mahindra कडून Thar Roxx Star एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत
चार्जिंगसाठी, 7.2 kW AC होम चार्जर वापरल्यास बॅटरी 10 ते 100 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे 6 तास 36 मिनिटे लागतात. तर 60 kW DC फास्ट चार्जरच्या मदतीने ही SUV 40 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होते. यामध्ये V2V (Vehicle to Vehicle) आणि V2L (Vehicle to Load) सारखी प्रगत फीचर्सही देण्यात आली आहेत.
Nexon.ev चे इंटिरिअरही अत्यंत प्रीमियम आहे. यामध्ये 12.3 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, वेंटिलेटेड सीट्स, सनरूफ आणि JBL साउंड सिस्टम यांसारखी आधुनिक फीचर्स मिळतात. विशेष म्हणजे, टाटा मोटर्सकडून हाय-व्होल्टेज बॅटरीवर लाइफटाइम वॉरंटी देखील दिली जाते.






