
फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम बाईक उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट आणि उत्तम परफॉर्मन्स बाईक ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे Moto Morini. नुकतेच कंपनीने त्यांच्या बाईकच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Moto Morini ने भारतातील आपल्या संपूर्ण लाइनअपच्या किंमती वाढवल्या आहेत. ही वाढ कंपनीच्या सर्व मॉडेल्स Seiemmezzo 650 Retro Street, Seiemmezzo 650 Scrambler, X-Cape 650 आणि X-Cape 650X वर लागू झाली आहे. किंमतीत कमाल 53,000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. कोणत्या मॉडेलची किती किंमत वाढली आहे? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात
सप्टेंबर 2025 मध्ये लागू झालेल्या नवीन GST बदलांनंतर Moto Morini ने सुरुवातीला सणासुदीच्या काळात करवाढीचा झटका ग्राहकांना दिला नाही, अशी घोषणा केली होती. मात्र फेस्टिव्हल सीझन संपल्यानंतर कंपनीने किंमतींमध्ये बदल करत वाढ लागू केली आहे.
Seiemmezzo 650 च्या दोन्ही व्हेरिएंट्स Retro Street आणि Scrambler आता महागले आहेत. Retro Street ची नवी किंमत 4.79 लाख रुपये झाली आहे, तर Scrambler ची किंमत 4.82 लाख रुपये इतकी झाली आहे. दोन्ही व्हेरिएंट्समध्ये डिझाइन आणि फीचर्सचा फरक आहे. Scrambler व्हेरिएंटमध्ये वायर-स्पोक व्हील्स, बीक-स्टाइल फ्रंट मडगार्ड आणि छोटी विंडस्क्रीन मिळते, तर Retro Street मध्ये अलॉय व्हील्स दिले जातात.
Mahindra XEV 9S ची पहिली झलक सबसे अलग! ‘या’ दिवशी होणार लाँच, Tata Curvv ला मिळणार जोरदार टक्कर
अॅडव्हेंचर सेगमेंटमधील X-Cape बाईकची किंमत देखील वाढली आहे. X-Cape 650 ची किंमत आता 6.40 लाख रुपये, तर X-Cape 650X ची किंमत 6.70 लाख रुपये झाली आहे.
सर्व मॉडेल्समध्ये 649cc पॅरेलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहे. Seiemmezzo 650 वर हे इंजिन 55hp पॉवर आणि 54Nm टॉर्क निर्माण करते. X-Cape 650 सीरिजमध्ये हेच इंजिन थोडे वेगळ्या प्रकारे ट्यून केले असून ते 60hp पॉवर आणि 54Nm टॉर्क देते. भारतात Moto Morini चा डिस्ट्रीब्यूशन पार्टनर Adishwar Auto Ride India आहे, जी Benelli, Zontes, Keeway आणि QJ Motor यांसारख्या ब्रँड्सचेही संचालन करते.