फोटो सौजन्य: Social Media
भारतात दुचाकी वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे, विविध दुचाकी उत्पादक कंपन्या भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक ऑफर्स आणि इंट्रेस्टिंग बाईक मॉडेल्स ऑफर करत आहेत. यापूर्वी, ग्राहक बाईक खरेदी करताना फक्त किंमतीकडे लक्ष देत असायचे, परंतु आजच्या काळात ही परिस्थिती खूप बदलली आहे. आजचा ग्राहक फक्त बाईकची किंमत पाहत नाही, तर त्याचा लूक, डिझाइन आणि इतर फीचर्सदेखील महत्त्वाचे मानतो. त्यामुळे, बाईक उत्पादक कंपन्या आकर्षक आणि आधुनिक डिझाइन असलेल्या बाईकवर भर देत आहेत. बाईकचा लूक, स्टाइल, रंग, आणि त्याच्या कार्यक्षमतेचे एकत्रित विचार करत ग्राहक निवड करत आहेत.
नुकतेच Moto Morini नावाच्या दुचाकी उत्पादक कंपनीने Seiemmezzo 650 बाईकच्या किमतीत 2 लाख रुपयांची मोठी कपात केली आहे. आता ही रेट्रो स्ट्रीट बाईक फक्त 4.99 लाख रुपयांना (एक्स-शोरूम) उपलब्ध असेल. या किमतीत घट झाल्यामुळे, मिडलवेट सेगमेंटमध्ये एक उत्तम व्हॅल्यू फॉर मनी ऑप्शन बनला आहे.
10 हजारांपेक्षा कमी पैसे भरून Hunter 350 होईल तुमच्या नावावर, फक्त जाणून घ्या EMI चं संपूर्ण गणित
Seiemmezzo 650 मध्ये कोणतेही यांत्रिक बदल नाहीत. हे 649 सीसी लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिनने सुसज्ज आहे, जे 54 बीएचपी पॉवर आणि 54 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन लो आणि मिड रेंजमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स देण्यासाठी ओळखली जाते. या बाइकमधील 6-स्पीड गिअरबॉक्स एक सुरळीत रायडिंग अनुभव देते. ही बाईक उत्तम कमी टॉर्कसह लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी देखील परिपूर्ण आहे.
या शक्तिशाली रेट्रो स्ट्रीट बाईकच्या लूक आणि डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण त्यात फुल-एलईडी लाइटिंग, आधुनिक आणि स्टायलिश लूक असे अनेक प्रीमियम फीचर्स उपलब्ध आहेत. याशिवाय, 5 इंचाचा TFT डिस्प्ले उपलब्ध आहे, जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येतो. याशिवाय, ड्युअल-चॅनेल ABS आणि USD फोर्क्स आणि मोनोशॉक सस्पेंशन उपलब्ध आहेत.
टाकी फुल्ल केल्यास कापेल 750 km चे अंतर ! फक्त 10 हजारात करा ‘ही’ बजेट बाईक तुमच्या नावावर
मोटो मोरिनी Seiemmezzo 650 ची स्पर्धा थेट कावासाकी Z650 सारख्या बाईक्सशी आहे. परंतु, 2 लाख रुपयांच्या किमतीत कपात केल्यानंतर, आता कावासाकी Z650 काय करते याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
जर तुम्ही प्रीमियम दर्जाची आणि उत्तम रेट्रो स्टाईलिंग असलेली ट्विन-सिलेंडर बाईक शोधत असाल, तर Seiemmezzo 650 ही एक उत्तम पर्याय आहे. आता ही शक्तिशाली बाईक इतक्या परवडणाऱ्या किमतीत खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी असू शकते.