Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KTM ला धडकी भरवण्यासाठी येतेय BMW ची ‘ही’ खास Adventure Bike, अपेक्षित किंमत 4 लाख रुपये

बीएमडब्ल्यूच्या अनेक कार आणि बाईक भारतात लोकप्रिय आहेत. मात्र, आता कंपनीने त्यांची नवीन ॲडव्हेंचर बाईक ऑफर करण्याच्या तयारीत आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 09, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • BMW नवीन ॲडव्हेंचर बाईक ऑफर करण्याच्या तयारीत
  • थेट KTM सोबत असेल स्पर्धा
  • जाणून घ्या किंमत
जर्मनीची प्रसिद्ध कंपनी BMW Motorrad भारतात आपली नवी ॲडव्हेंचर बाईक BMW F 450 GS येत्या 23 एप्रिल 2026 रोजी लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही बाईक कंपनीच्या एंट्री-लेव्हल ॲडव्हेंचर सेगमेंटमध्ये मोठा बदल घडवून आणणार आहे. विशेष म्हणजे BMW पहिल्यांदाच 500cc पेक्षा कमी क्षमतेच्या ट्विन-सिलेंडर सेगमेंटमध्ये प्रवेश करत आहे, जो भारतात सध्या वेगाने लोकप्रिय होत आहे.

ही बाईक TVS Motor Company च्या सहकार्याने भारतात तयार केली जाणार आहे. यामुळे तिची किंमत तुलनेने नियंत्रित राहण्याची शक्यता आहे. याआधी BMW आणि TVS यांनी मिळून G 310 सीरिज विकसित केली होती, ज्याला भारतीय ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Toyota ची ‘ही’ कार खरेदी करण्याची शेवटची संधी गमावू नका! कंपनी थेट प्रोडक्शन बंद करण्याच्या तयारीत?

इंजिन आणि परफॉर्मन्स

BMW F 450 GS मध्ये 420cc लिक्विड-कूल्ड पॅरेलल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन सुमारे 48 bhp पॉवर आणि 43 Nm टॉर्क निर्माण करते, ज्यामुळे या सेगमेंटमध्ये ती दमदार ठरते. यात 6-स्पीड गिअरबॉक्ससह स्लिपर क्लच आणि क्विकशिफ्टरसारखी फीचर्स दिली आहेत. त्यामुळे राइडिंग अनुभव अधिक स्मूद आणि गिअर बदलणे सोपे होते. सिंगल-सिलेंडर इंजिनच्या तुलनेत हे इंजिन लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक योग्य मानले जाते.

डिझाइन, सस्पेंशन आणि हार्डवेअर

या बाइकचा डिझाइन पूर्णपणे ॲडव्हेंचर स्टाइलमध्ये असून लांब प्रवास आणि खराब रस्त्यांसाठी उपयुक्त आहे. यात ट्रेलिस फ्रेम दिला आहे, ज्यामुळे बाईक मजबूत आणि हलकी बनते. सस्पेंशनसाठी पुढे अपसाइड-डाउन फोर्क्स आणि मागे मोनोशॉक सेटअप देण्यात आला आहे. हे सेटअप रस्ते आणि हलक्या ऑफ-रोडसाठी योग्य मानले जाते. बाईकचे वजन सुमारे 175 किलो आहे. तसेच 19-इंच फ्रंट आणि 17-इंच रिअर व्हील्समुळे विविध रस्त्यांवर सहज चालवता येते.

जगातील सर्वात लांब कार पाहिलीत का? 100 फूट लांब, हेलिपॅड आणि स्विमिंग पूलसह 75 लोक बसतील एवढी जागा

किंमत आणि स्पर्धा

BMW F 450 GS ची भारतातील किंमत सुमारे 4 ते 4.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. लाँचनंतर या बाईकची थेट स्पर्धा KTM 390 Adventure आणि Royal Enfield Himalayan 450 यांसारख्या लोकप्रिय बाईक्सशी होणार आहे. त्यामुळे या सेगमेंटमध्ये BMW साठी स्पर्धा कडवी असण्याची शक्यता आहे.

 

Web Title: New adventure bike bmw f 450 gs launch on 23 april 2026 compete with ktm bikes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • BMW
  • bmw bikes

संबंधित बातम्या

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट
1

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट

कारचा ‘वायपर’ चालू केल्यावर खडखड आवाज येतोय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय!
2

कारचा ‘वायपर’ चालू केल्यावर खडखड आवाज येतोय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय!

नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!
3

नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!

किया इंडियाची ऐतिहासिक कामगिरी! जून महिन्यात २४,५५२ गाड्यांची विक्री करत नोंदवला नवा उच्चांक
4

किया इंडियाची ऐतिहासिक कामगिरी! जून महिन्यात २४,५५२ गाड्यांची विक्री करत नोंदवला नवा उच्चांक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.