Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMW New Luxury Cars: कारप्रेमींची प्रतीक्षा संपली! नवी BMW 7 Series अन् इलेक्ट्रिक i7 ११ सप्टेंबरला होणार भारतात लॉन्च होणार

बीएमडब्ल्यूची फ्लॅगशिप सेडान 7 सिरीज आणि ऑल-इलेक्ट्रिक i7 भारतीय बाजारात एका नव्या आणि प्रगत रूपात लवकरच एन्ट्री करत आहे. उत्कृष्ट ड्रायव्हिंग तंत्रज्ञान, सुधारित बॅटरी आणि अद्वितीय केबिन लक्झरीसह येणाऱ्या या दोन्ही प्रीमियम गाड्या देशभरातील कारप्रेमींचे लक्ष वेधून घेत असून ऑटोमोबाईल जगतात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 19, 2026 | 03:52 PM
BMW New Luxury Cars: कारप्रेमींची प्रतीक्षा संपली! नवी BMW 7 Series अन् इलेक्ट्रिक i7 ११ सप्टेंबरला होणार भारतात लॉन्च होणार
Follow Us
Follow Us:
  • BMWची नवीन 7 सिरीज आणि इलेक्ट्रिक i7 भारतात 11 सप्टेंबर रोजी अधिकृतपणे लाँच होणार आहे.
  • या गाड्यांमध्ये अपडेटेड इंजिन आणि नवीन 112.4 kWh क्षमतेची बॅटरी रेंज देण्यात आली आहे.
  • केबिनमध्ये 8K रिझोल्यूशन थिएटर स्क्रीनसह बीएमडब्ल्यूचे प्रगत पॅनोरॅमिक आयड्राइव्ह ऑपरेटिंग सिस्टीम तंत्रज्ञान समाविष्ट आहे.

एप्रिल 2026 मध्ये जागतिक स्तरावर सादर झाल्यानंतर आता ही अपडेटेड रेंज भारतीय बाजारात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. या नव्या अवतारात डिझाइन, पॉवरट्रेन, तंत्रज्ञान आणि ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

डिझाइन आणि केबिन फीचर्स

या सेडानच्या समोरील बाजूला इल्युमिनेटेड किडनी ग्रिल आणि क्रिस्टल-स्टाईल हेडलाइट्स देण्यात आले आहेत. मागच्या बाजूला देखील नवीन डिझाइनचे लाईट्स मिळतात. केबिनमध्ये बीएमडब्ल्यूची नवीन पॅनोरॅमिक आयड्राइव्ह सिस्टीम, ऑपरेटिंग सिस्टीम 10 आणि समोरच्या प्रवाशासाठी एक स्वतंत्र डिस्प्ले आहे. मागच्या सीटवरील प्रवाशांसाठी 8K रिझोल्यूशन असलेली थिएटर स्क्रीन दिली आहे. याव्यतिरिक्त डॉल्बी ॲटमॉससह बॉवर्स अँड विल्किन्स साउंड सिस्टीम, फोर-झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक ग्लास रूफ आणि एग्झिक्युटिव्ह लाउंज सीट्स यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

२८.६५ किमी/लीटर मायलेज, ६ एअरबॅग्स अन् सनरूफ! या आहेत भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या हायब्रिड कार्स

इंजिन आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेन

पेट्रोल व्हर्जन 740i xDrive मध्ये 3.0-लीटर मायल्ड-हायब्रिड इंजिन मिळते, जे 400 हॉर्सपॉवर आणि 580 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. डिझेल व्हर्जन 740d xDrive मध्ये 3.0-लीटर इंजिन आहे, जे 313 हॉर्सपॉवर आणि 670 न्यूटन मीटर टॉर्क देते. दोन्ही मॉडेलमध्ये 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीम आहे. इलेक्ट्रिक रेंजमध्ये जुन्या मॉडलऐवजी नवीन i7 xDrive50 आणले असून त्याला मोठी 112.4 किलोवॉट-अवर बॅटरी जोडली आहे. हे मॉडेल 455 हॉर्सपॉवर देते. तर टॉप-एंड i7 M70 xDrive मॉडेलची पॉवर वाढवून 680 हॉर्सपॉवर आणि टॉर्क 1,100 न्यूटन मीटर करण्यात आला आहे. नवीन बॅटरीमुळे ही गाडी एका चार्जमध्ये 720 किमीपेक्षा जास्त रेंज देईल असा दावा केला आहे.

BMW X1 Launch : भारतात लाँचिंगपूर्वीच बीएमडब्ल्यू X1 लाँग व्हीलबेसच्या प्री-बुकिंगला सुरुवात! या’ दिवशी होणार ऑफीशल एंट्री!

ड्रायव्हिंग तंत्रज्ञान आणि स्पर्धा

सुरक्षेसाठी यात बीएमडब्ल्यूची सिम्बायोटिक ड्राइव्ह सिस्टीम दिली आहे, जी ऑटोमेटेड ड्रायव्हिंग आणि हायवेवर 130 किमी प्रतितास वेगापर्यंत हँड्स-फ्री असिस्टन्सला सपोर्ट करते. गाडीचा प्रवास गुळगुळीत व्हावा यासाठी ॲडॉप्टिव्ह टू-ॲक्सल एअर सस्पेंशन स्टँडर्ड म्हणून दिले आहे. सध्याच्या बीएमडब्ल्यू 7 सिरीजची भारतातील एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.81 कोटी ते 2.50 कोटी रुपयांच्या दरम्यान असून नवीन व्हर्जनच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात या गाडीची थेट स्पर्धा मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, मर्सिडीज EQS आणि ऑडी A8L या लक्झरी गाड्यांशी असेल.

Web Title: New bmw 7 series and i7 india launch auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • BMW
  • cars

संबंधित बातम्या

Skoda Octavia: स्कोडा ऑक्टाव्हिया RS ची दुसरी बॅच भारतासाठी जाहीर! लवकरच होणार लाँच! पाहा काय असतील स्पेशल फीचर्स
1

Skoda Octavia: स्कोडा ऑक्टाव्हिया RS ची दुसरी बॅच भारतासाठी जाहीर! लवकरच होणार लाँच! पाहा काय असतील स्पेशल फीचर्स

Maruti Fronx Export: मारुती फ्रॉन्क्सचा नवा विक्रम; २ लाख गाड्यांची सर्वात जलद निर्यात करणारी पहिली भारतीय SUV
2

Maruti Fronx Export: मारुती फ्रॉन्क्सचा नवा विक्रम; २ लाख गाड्यांची सर्वात जलद निर्यात करणारी पहिली भारतीय SUV

India Automative Steel Project: AM/NS इंडियाकडून सुरू झाला भारतातील प्रिमियम कोटेड ऑटोमोटिव्ह स्टीलचा पहिला उत्पादन प्रकल्प
3

India Automative Steel Project: AM/NS इंडियाकडून सुरू झाला भारतातील प्रिमियम कोटेड ऑटोमोटिव्ह स्टीलचा पहिला उत्पादन प्रकल्प

२८.६५ किमी/लीटर मायलेज, ६ एअरबॅग्स अन् सनरूफ! या आहेत भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या हायब्रिड कार्स
4

२८.६५ किमी/लीटर मायलेज, ६ एअरबॅग्स अन् सनरूफ! या आहेत भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या हायब्रिड कार्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.