यापेक्षा स्वस्त E Scooter शोधून सापडणार नाही ! 100 किमीची रेंज अन् किंमत फक्त 59,990 रुपये
भारतात इंधनाच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसते. यामुळे ग्राहक इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक स्कूटरला जास्त प्राधान्य देताय. तसेच, सरकार देखील विविध योजनांच्या मार्फत इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीस प्रोत्साहन मिळत आहे. इलेक्ट्रिक दुचाक्यांच्या मागणीत सुद्धा झपाट्याने वाढ होत आहे. त्यात Ola Electric ,TVS, Hero MotoCorp सारख्या कंपन्यांनी दमदार परफॉर्मन्स असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर केल्या आहेत. अशातच आता मार्केटमध्ये एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे ही स्कूटर 59,990 रुपयात लाँच झाला आहे.
स्टार्टअप कंपनी Zelo Electric ने भारतीय बाजारात आपली नवीन, किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर Knight+ सादर केली आहे. कंपनीच्या मते, ही भारतातील आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर असून, महागड्या मॉडेल्समध्ये मिळणारी अनेक आवश्यक स्मार्ट फीचर्स यात दिली आहेत. कमी बजेटमध्ये चांगला परफॉर्मन्स आणि फीचर्स हवे असलेल्या ग्राहकांसाठी Knight+ खास डिझाइन करण्यात आले आहे.
6 एअरबॅग्स आणि दमदार मायलेजसह Maruti Suzuki ‘ही’ कार, किंमत फक्त 5.79 लाखांपासून सुरू
नाईट+ चे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे परवडणाऱ्या किमतीत मिळणारे दमदार फीचर्स. फक्त 59,990 (एक्स-शोरूम) किमतीत ही स्कूटर हिल होल्ड कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, फॉलो-मी-होम हेडलॅम्प, यूएसबी चार्जिंग पोर्ट यांसारख्या सोयीसह उपलब्ध आहे. यात रिमूव्हेबल बॅटरी दिली आहे, जी चार्जिंग आणि देखभालीसाठी अधिक सोयीची ठरते. ही स्कूटर ग्लॉसी व्हाईट, ग्लॉसी ब्लॅक आणि ड्युअल-टोन फिनिशसह एकूण 6 रंगांमध्ये उपलब्ध असून, विशेषतः तरुण ग्राहकांसाठी आकर्षक ठरेल.
झेलो नाईट+ मध्ये 1.8kWh पोर्टेबल LFP बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ती 100 किमीपर्यंतची रिअल-वर्ल्ड रेंज देते. शहरातील वापर लक्षात घेऊन याचा टॉप स्पीड 55 किमी/तास ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे हा दैनंदिन प्रवासासाठी उत्तम पर्याय ठरतो. वाढत्या इंधन दरामुळे त्रस्त असलेल्या आणि इलेक्ट्रिक पर्यायाकडे वळू इच्छिणाऱ्यांसाठी नाईट+ फायदेशीर ठरू शकते.
Mercedes पासून Mahindra पर्यंत, ‘या’ 8 पावरफुल कार होणार लाँच?
या स्कूटरची डिलिव्हरी 20 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असून, देशभरातील झेलो डीलरशिपवर प्री-बुकिंग सुरू झाले आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये ई-स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
लाँचिंगवेळी झेलो इलेक्ट्रिकचे सह-संस्थापक मुकुंद बाहेती यांनी सांगितले की, “नाईट+ ही केवळ एक स्कूटर नाही, तर भारतात स्मार्ट आणि स्वच्छ गतिशीलतेसाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. सामान्य ग्राहकाला परवडणाऱ्या किमतीत प्रीमियम दर्जाची आणि अत्याधुनिक फीचर्स असलेली इलेक्ट्रिक वाहनं मिळावीत, या हेतूने नाईट+ डिझाइन करण्यात आली आहे.”