
फोटो सौजन्य: @nirmaltv/X.com
कंपनीने या कारमध्ये कोणते फीचर्स दिले आहेत, यात कोणते पॉवरफुल इंजिन दिले आहे आणि ते कोणत्या एसयूव्हीशी स्पर्धा करेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
किआने नवीन जनरेशनची सेल्टोस सादर केली आहे. या एसयूव्हीमध्ये डिझाइन बदलण्यासोबतच कंपनीने अनेक नवीन फीचर्स सादर केले आहेत. यात मेटल ॲक्सेंटसह एक नवीन डिजिटल टायगर फेस, एक SCDI प्लेट आणि स्टारमॅप एलईडी लाईट्स समाविष्ट आहेत.
Nexon की Victoris? कोण आहे सर्वात सुरक्षित? उत्तराखंडमधील ‘या’ Video मुळे सुरू झाला वाद
कंपनीने या एसयूव्हीला जागतिक स्तरावर ऑफर केलेल्या K3 प्लॅटफॉर्मवर आधारित एक नवीन डिझाइन दिले आहे. एसयूव्हीमध्ये नवीन बंपर, फ्रंट ग्रिल आणि लाईट्स देखील आहेत.
किआने नवीन जनरेशनच्या सेल्टोसमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिली आहेत. एसयूव्हीमध्ये 30-इंचाचा डिस्प्ले आहे, ज्यामध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टमचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, एसयूव्हीमध्ये वायरलेस चार्जर, व्हेंटिलेटेड सीट्स, 10-वे पॉवर ड्रायव्हर सीट, 64-रंगी ॲम्बियंट लाईट, आठ-स्पीकर बोस ऑडिओ सिस्टम, नवीन एसी कंट्रोल्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि लेव्हल-2 एडीएएस, एबीएस, ईबीडी आणि आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेजसह 21 सेफ्टी फीचर्स समाविष्ट आहेत.
नवीन सेल्टोसची लांबी 4,460 मिमी आणि रुंदी 1830 मिमी आहे. यात 2,690 मिमी व्हीलबेस देखील आहे, जो मागील जनरेशन पेक्षा 90 मिमी लांब आहे.
या एसयूव्हीमध्ये कंपनीने एकूण तीन इंजिन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत, दोन पेट्रोल आणि एक डिझेल. एसयूव्हीमध्ये 1.5 लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 115 PS ची पॉवर आणि 144 Nm टॉर्क निर्माण करते. दुसरा पर्याय म्हणून 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते, ज्यातून 160 PS पॉवर आणि 253 Nm टॉर्क मिळतो.
डिझेल पर्यायामध्ये 1.5 लिटर डिझेल इंजिन असून ते 116 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क निर्माण करते.
यासोबतच या एसयूव्हीमध्ये मॅन्युअल, IVT, IMT आणि ऑटोमॅटिक अशा विविध ट्रान्समिशन पर्यायांची सुविधा दिली आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, या एसयूव्हीची बुकिंग आजपासून सुरू केली आहे. या वाहनाची किंमत जानेवारीत जाहीर केली जाणार असून त्यानंतर डिलिव्हरीची प्रक्रिया सुरू केली जाईल.