टाटा नेक्सन आणि मारुती व्हिक्टोरिस (फोटो- सोशल मीडिया)
टाटा नेक्सन आणि मारुती व्हिक्टोरिस यांचा मार्केटमध्ये जलवा
ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या दोन्ही गाड्या
सुरक्षेमध्ये दोन्ही गाड्यांचा चांगला अनुभव
भारतात अनेक ऑटोमोबाइल कंपन्या आहेत. भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्या आपली नवनवीन मॉडेल्स ग्राहकांसाठी लॉंच करत असतात. आज आपण टाटा नेक्सन आणि मारुती व्हिक्टोरिस यांच्याबाबत जाणून घेणार आहोत. टाटा मोटर्स संपूर्ण भारतात मजबूत आणि सुरक्षित गाड्यांसाठी ओळखली जाते. अनेकदा त्या गाड्यांचे अपघात होऊन देखील गाडीला फारसे नुकसान न झाल्याचे पाहायला मिळते. दरम्यान मारुती सुझुकी देखील ग्राहकांच्या सुरक्षेवर गांभीर्याने काम करते. उत्तराखंडमध्ये नेक्सन आणि व्हिक्टोरिस यांची धडक जल्याने या चर्चेला उधाण आले आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
Dehradun Wale Official या सोशल मीडिया पेजवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये उत्तराखंडमधील एका डोंगराळ भागातील रस्त्यावर टाटा नेक्सन आणि मारुती व्हिक्टोरिस या दोन गाड्यांची जोरदार धडक होते. हा व्हिडिओ व्हिक्टोरिसच्या मागील बाजूने सुरू होतो. त्यामध्ये त्याची नेक्सनशी टक्कर झाल्याचे दिसून येते. त्यानंतर कॅमेरा नेक्सनकडे जातो. ते एक जून मॉडेल असल्याचे दिसून येते.
कोणाचे झाले नुकसान?
या व्हिडिओनुसार, टाटा नेक्सनच्या पुढील उजव्या भागाचे गंभीर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. बंपर, हेडलाइट, फॉग लॅम्प पूर्णपणे तुटलेले होते. चालकाच्या बाजूला देखील मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. टाटा नेक्सनचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होणे हे अत्यंत दुर्मिळ असे असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच हा अपघात किती भीषण असेल याची तीव्रता समजून येते.
मात्र मारुती व्हिक्टोरिसचे कमी नुकसान झाल्याचे आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. बंपर, हेडलाईट वगळता गाडीला फारसे नुकसान झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दोन्ही गाड्यांची सुरक्षा मानके काय आहेत?
टाटा नेक्सन हे कंपनीचे जून मॉडेल आहे. त्या मॉडेलने ncap मध्ये आधीच 5 स्टार रेटिंग प्राप्त केले आहे. त्या टेस्टच्या समोर आजचा अपघातात जारी गाडीचे नुकसान झाले असले तरी नेक्सक्ष अजूनही एक मजबूत आणि सुरक्षित गाडी समजली जाते. तर व्हिक्टोरिस ही मारुतीची पहिली गाडी आहे जिला ncap मध्ये स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे. यावरून मारूतीने सुरक्षा या विषयावर किती गांभीर्याने काम केले आहे हे दिसून येते.






