Tata Motors Excon 2025 मध्ये आघाडीवर (Photo Credit- X)
एक्सकॉल २०२५ मध्ये व्यावसायिक वाहने लाँच करत टाटा मोर्ट्स लिमिटेडच्या ट्रक्स विभागाचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्हणाले, ”एक्सकॉन टाटा मोटर्सकरिता प्रगत अभियांत्रिकी व ग्राहक-केंद्रित सोल्यूशन्सचे प्रदर्शन करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. आम्ही भारतातील विकसित होत असलेल्या बांधकाम व गहरी खाणकाम क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी हे सोल्यूशन्स सादर करत आहोत. देशभरात पायाभूत सुविधा विकसित करण्याला सक्रियपणे गती मिळाली असताना ग्राहक विश्वसनीय, उच्च-उत्पादनक्षम ऑफरिंग्जचा शोध घेत आहेत, जे ऑपरेशनल कार्यक्षमता आणि लाभक्षमता वाढवतात. प्रमुख प्राइमा ३५४०. के लाँच करत आम्हाला सर्वात आव्हानात्मक स्थितींसाठी डिझाइन करण्यात आलेल्या उद्देश-केंद्रित सोल्यूशनसह गहरी खाणकाम क्षेत्रात प्रवेश करण्याचा अभिमान वाटतो. शाश्वत गतीशीलतेप्रती आमची कटिबद्धता अधिक प्रबळ करत आम्हाला आमचा पहिला ऑल-इलेक्ट्रिक टिपर प्राइमा ई.२८के लाँच करण्याचा आनंद होत आहे, जो शक्ती किंवा उत्पादकतेबाबत तडजोड न करता शून्य-उसर्जनासह कार्यक्षमता देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.”
टाटा मोटर्सने प्रबळ अभियांत्रिकी व प्र कठोर सत्यापन पाठबळ असलेल्या अॅग्रीगेट्सच्या व्यापक श्रेणीचे देखील अनावरण केले. विश्वसनीय, दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्यात आलेले हे अॅग्रीगेट्स बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्रांमधील विविध उपयोजनांसाठी साह्य करतात.
अॅग्रीगेट्स पोर्टफोलिओचे अनावरण करत टाटा मोटर्स लिमिटेडच्या स्पेअर्स अँड नॉन-वेईक्युलर बिझनेसचे प्रमुख श्री. विक्रम अग्रवाल म्हणाले, ”एक्सकॉन २०२५ मध्ये आमच्या अॅग्रीगेट ऑफरिंग्जच्या प्रदर्शनामधून शक्तिशाली, विश्वसनीय आणि ग्राहक-केंद्रित सोल्यूशन्स वितरित करण्याप्रती टाटा मोटर्सची कटिबद्धता दिसून येते. हे सोल्यूशन्स बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये विनासायास कार्यसंचालनांसाठी मदत करतात. लाँच करण्यात आलेले आमचे नवीन १५ केव्हीए व ३५ केव्हीए जेनसेट्स आणि CEV BS V औद्योगिक इंजिन्सच्या विस्तारित श्रेणीसह आम्ही प्रदर्शन, अपटाइम और परिचालन दक्षता आमचा फोकस अधिक प्रबळ करत आहोत. आम्ही ऑफरिंग्जसह आमचा पोर्टफोलिओ अधिक वाढवत राहू, जे आमच्या ग्राहकांच्या कार्यसंचालनांना कार्यक्षम, उत्पानदक्षम आणि भविष्याकरिता तयार ठेवतील.”
टाटा मोटर्सचे प्रदर्शन व्यावसायिक वाहने
अॅग्रीगेट्स आणि जेनसेट्स






