Bhaubij 2026: भाऊबीजेला भावाला ओवाळण्याची योग्य वेळ कोणती? वाचा पंचांग माहिती, पूजा विधी, धार्मिक महत्त्व, आणि परंपरा... ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
दिवाळीच्या पाच दिवसांच्या आनंदासोहळ्यातील अत्यंत शेवटचा आणि गोड सण म्हणजे भाऊबीज! कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीयेला साजरी केली जाणारी भाऊबीज (Bhaubij 2026) ही भाऊ आणि बहिणीच्या पवित्र, निर्मळ आणि जिव्हाळ्याच्या नात्याची वीण अधिक घट्ट करणारी ठरते. यंदा म्हणजेच २०२६ मध्ये भाऊबीजेचा हा सण कधी आहे, औक्षणासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता आणि पूजेची पारंपरिक पद्धत काय आहे, याविषयीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. बहिणीच्या प्रेमाची साक्ष देणारा हा सण कुटुंबात एक वेगळाच उत्साह घेऊन येतो.
वैदिक पंचांगानुसार, यंदा भाऊबीज बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी साजरी केली जात आहे. पंचांग गणनेनुसार, कार्तिक शुद्ध द्वितीया तिथीची सुरुवात आदल्या दिवशी म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी दुपारी २:०० वाजता होईल आणि ती ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:५३ वाजता समाप्त होईल. उदया तिथ Nनुसार ११ नोव्हेंबरला हा सण साजरा करणे अत्यंत फलदायी मानले गेले आहे. यादरम्यान बहिणी आपल्या लाडक्या भावांना घरी बोलावून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतात.
प्रत्येक सणात शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. यंदाच्या भाऊबीजेला भावाचे औक्षण करण्यासाठी दुपारी १:३० ते दुपारी ३:४६ हा वेळ अत्यंत शुभ मानला गेला आहे. हा अपऱ्हाण काळातील मुख्य मुहूर्त आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार, द्वितीया तिथी संपूर्ण दिवस असल्याने ज्यांना या विशिष्ट वेळेत जमणार नाही, ते सायंकाळच्या सत्रातही आपल्या भावाचे औक्षण करू शकतात. अर्थात, तुमच्या शहराच्या वेळेनुसार सूर्यमानानुसार या वेळेत काही मिनिटांचा फरक असू शकतो, त्यामुळे पंचांग बघून औक्षण करणे उत्तम ठरेल.
हे देखील वाचा : Chitragupta Puja: यमराजाला सहाय्यकाची गरज का भासली? चित्रगुप्त कसे झाले प्रकट
हिंदू धर्मात प्रत्येक सणामागे कोणती ना कोणती पौराणिक कथा दडलेली असते. भाऊबीजेला ‘यमद्वितीया’ असेही म्हटले जाते. पौराणिक आख्यायिकेनुसार, या पवित्र दिवशी मृत्यूचे देवता असलेले यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी गेले होते. यमुनेने अतिशय प्रेमाने भावाचे स्वागत केले, ओवाळले आणि त्याला जेवणाचा आस्वाद दिला. बहिणीचे हे निखळ प्रेम पाहून यमराज अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी यमुनेला वर मागण्यास सांगितले. तेव्हा यमुनेने वचन मागितले की, “या दिवशी जी बहीण आपल्या भावाचे औक्षण करेल, त्याला यमराजदेवांची भीती वाटणार नाही आणि त्याचे आयुष्य दीर्घ होईल.” तेव्हापासून ही परंपरा अखंड सुरू आहे.
हे देखील वाचा : Budh Graha Uday: बुध ग्रहाचा आज उदय, ५ राशींचं उजळणार नशीब; आर्थिक लाभाची शक्यता
भाऊबीजेच्या दिवशी घरामध्ये एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केले जाते आणि पाटाभोवती सुंदर रांगोळी काढली जाते.
आजच्या धकाधकीच्या युगातही भाऊबीजेचे महत्त्व आणि गोडवा यत्किंचितही कमी झालेला नाही. नोकरी किंवा व्यवसानिमित्त शहरापासून दूर राहणारे भाऊ या दिवशी आवर्जून आपल्या बहिणीच्या घरी पोहोचतात. बहिणी देखील आपल्या हाताने बनवलेले खास पदार्थ भरवून भावाचे कोडकौतुक करतात. हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर भाऊ-बहिणीमधील बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा, एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहण्याची शपथ घेण्याचा एक सुंदर सोहळा आहे. हा सण कुटुंबातील नातेसंबंधांना अधिक घट्ट आणि समृद्ध बनवतो.
Ans: यंदा भाऊबीज बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी साजरी केली जात आहे.
Ans: भावाच्या औक्षणाचा मुख्य मुहूर्त दुपारी १:३० ते ३:४६ पर्यंत आहे, परंतु दिवसभर कधीही औक्षण करता येते.
Ans: पौराणिक मान्यतेनुसार भाऊबीजेला 'यमद्वितीया' असेही म्हटले जाते.






