Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ह्युंदाई टक्सन N Line आली नव्या अवतारात! 288 hp पॉवर, 67 किमी रेंज; फीचर्स पाहून व्हाल थक्क

ह्युंदाई टक्सन N Line मध्ये 3 इलेक्ट्रिफाइड पेट्रोल पॉवरट्रेन, 17-इंच टचस्क्रीन आणि आधुनिक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. प्लग-इन हायब्रिड व्हेरिएंट 288 hp पॉवर आणि 67 किमीपर्यंत इलेक्ट्रिक रेंज देतो. भारतातील लाँच आणि किंमतीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 13, 2026 | 04:14 PM
ह्युंदाई टक्सन N Line आली नव्या अवतारात! 288 hp पॉवर, 67 किमी रेंज; फीचर्स पाहून व्हाल थक्क
Follow Us
Follow Us:
  • ह्युंदाई टक्सन N Line च्या प्लग-इन हायब्रिड मॉडेलमध्ये 288 hp पॉवर मिळते.
  • 17.1 kWh बॅटरीसह या एसयूव्हीमध्ये 67 किमीपर्यंत इलेक्ट्रिक रेंज मिळते.
  • स्पोर्टी डिझाइन, 20-इंच अलॉय व्हील्स आणि 17-इंच टचस्क्रीन ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

ह्युंदाईने आपल्या नव्या जनरेशनच्या टक्सन N Line एसयूव्हीचे अनावरण केले आहे. 2026 पॅरिस मोटर शोमध्ये सादर झालेल्या या स्पोर्टी एसयूव्हीमध्ये आकर्षक डिझाइन, प्रीमियम इंटिरियर आणि हायब्रिड इंजिनचे पर्याय देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, प्लग-इन हायब्रिड व्हेरिएंटमध्ये 288 hp पॉवर आणि 67 किमीपर्यंत इलेक्ट्रिक रेंज मिळते. त्यामुळे स्पोर्टी लूकसोबत इलेक्ट्रिक ड्रायव्हिंगचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या कस्टमर्ससाठी ही एसयूव्ही चर्चेचा विषय ठरली आहे.

स्पोर्टी लूकसाठी खास डिझाइन

नवीन ह्युंदाई टक्सन N Line मध्ये 20-इंचाचे अलॉय व्हील्स, आकर्षक फ्रंट बंपर, सॅटिन ब्लॅक एअर डक्ट्स आणि बॉडी-कलर साइड स्कर्ट्स देण्यात आले आहेत. मागच्या बाजूला डिफ्यूजरसारखी डिझाइन असलेला बंपर आणि ट्विन एक्झॉस्ट आउटलेट्स मिळतात. ग्लॉसी ब्लॅक मिरर्स आणि N Line बॅजिंगमुळे या एसयूव्हीला स्पोर्टी लूक मिळतो. ह्युंदाईची खास H-आकाराची लाइटिंग डिझाइनही कायम ठेवण्यात आली आहे.

292 PS ची SUV, 81 km इलेक्ट्रिक रेंज आणि AWD! ह्युंदाई ट्यूसॉनचा नवा प्लग-इन हायब्रिड अवतार करणार मार्केटमध्ये राडा!

3 इंजिन ऑप्शन, जास्तीत जास्त 288 hp पॉवर

या एसयूव्हीमध्ये 3 प्रकारचे इलेक्ट्रिफाइड पेट्रोल पॉवरट्रेन मिळतात. पहिल्या 1.6-लिटर T-GDi पेट्रोल इंजिनला 48V माइल्ड-हायब्रिड सिस्टीमची जोड दिली असून ते 148 hp पॉवर देते. यासोबत 7-स्पीड ड्युअल-क्लच गिअरबॉक्स मिळतो.

दुसऱ्या फुल-हायब्रिड व्हेरिएंटमध्ये 1.6-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.49 kWh बॅटरी मिळून 242 hp पॉवर निर्माण होते. तर प्लग-इन हायब्रिड मॉडेलमध्ये 17.1 kWh बॅटरी असून एकत्रित पॉवर 288 hp आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, या व्हेरिएंटला इलेक्ट्रिक मोडमध्ये 67 किमीपर्यंत प्रवास करता येतो. फ्रंट-व्हील ड्राइव्ह आणि ऑल-व्हील ड्राइव्हचे ऑप्शनही मिळणार आहेत.

Hyundai Bayon च्या लाँचपूर्वीच वाढली उत्सुकता, Panoramic Sunroofसह मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

इंटिरियरमध्ये मोठी स्क्रीन आणि आधुनिक फीचर्स

केबिनमध्ये 17-इंचाची टचस्क्रीन, Pleos Connect इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि AI व्हॉइस असिस्टंट देण्यात आला आहे. लाल स्टिचिंग असलेल्या स्पोर्ट सीट्स, N स्टीअरिंग व्हील, मेटल पेडल्स आणि प्रीमियम फिनिशमुळे आतील भागाला वेगळा लूक मिळतो. निवडक व्हेरिएंटमध्ये Bang & Olufsen चे 12-स्पीकर ऑडिओ सिस्टम, डिजिटल की आणि वायरलेस चार्जिंगची सुविधाही आहे.

सुरक्षिततेसाठी ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, हायवे ड्रायव्हिंग असिस्ट आणि पार्किंग कोलिजन अव्हॉइडन्स यांसारखी फीचर्स मिळतात. मागच्या सीट्स 4:2:4 पद्धतीने फोल्ड करता येतात आणि बूट स्पेस 613 लिटरपर्यंत आहे.

भारतात कधी येणार?

नवीन ह्युंदाई टक्सन N Line चे अनावरण युरोपमध्ये झाले असले, तरी भारतातील लाँचची तारीख आणि किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे भारतीय कस्टमर्सना या स्पोर्टी हायब्रिड एसयूव्हीसाठी कंपनीच्या पुढील घोषणेची वाट पाहावी लागेल.

 

Web Title: New hyundai tucson n line 288hp phev range features auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • automobile
  • Hyundai
  • SUV cars

संबंधित बातम्या

Gondiya News: ३३०२ इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर! प्रदूषण नियंत्रणासाठी ई वाहनांना पसंती; ई-दुचाकींची संख्या सर्वाधिक
1

Gondiya News: ३३०२ इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर! प्रदूषण नियंत्रणासाठी ई वाहनांना पसंती; ई-दुचाकींची संख्या सर्वाधिक

पेट्रोलचा खर्च कमी, फीचर्सचा जलवा भारी! किया सेल्टोस हायब्रिडची युरोपमध्ये एन्ट्री! भारतात पुढच्या वर्षी लाँच होण्याची शक्यता
2

पेट्रोलचा खर्च कमी, फीचर्सचा जलवा भारी! किया सेल्टोस हायब्रिडची युरोपमध्ये एन्ट्री! भारतात पुढच्या वर्षी लाँच होण्याची शक्यता

पावसाळ्यात ओला S1 Z की TVS आयक्यूब; सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती ई-स्कूटर आहे सर्वोत्तम
3

पावसाळ्यात ओला S1 Z की TVS आयक्यूब; सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती ई-स्कूटर आहे सर्वोत्तम

टाटा मोटर्स आणि स्टेलँटिसची मोठी पार्टनरशिप! भारतात तयार होणार 50 पेक्षा जास्त जागतिक मार्केटसाठी नवी वाहने
4

टाटा मोटर्स आणि स्टेलँटिसची मोठी पार्टनरशिप! भारतात तयार होणार 50 पेक्षा जास्त जागतिक मार्केटसाठी नवी वाहने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.