
फोटो सौजन्य: @HyundaiIndia/X.com
Hyundai ने भारतात त्यांच्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही, व्हेन्यूचे एक नवीन आणि स्पोर्टी व्हर्जन, Venue N-Line सादर केली आहे. बुकिंग 25000 मध्ये चालू झाली आहे. ही कार 4 नोव्हेंबर 2025 रोजी लाँच होणार आहे. हे नवीन मॉडेल अशा लोकांसाठी डिझाइन करण्यात आले आहे ज्यांना व्हेन्यूसारख्या एसयूव्हीत राहून स्पोर्टी, आणि परफॉर्मन्सवर लक्ष केंद्रित करणारा ड्रायव्हिंग अनुभव हवा आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
ह्युंदाईने व्हेन्यू एन-लाइनला अधिक ठळक आणि अधिक उत्तम लूक दिला आहे. नवीन मॉडेल आता एका खास गडद क्रोम ग्रिल, लाल रंगाचे ॲक्सेंट आणि ड्युअल-टोन बॉडी पर्यायासह येते. यात एन-बॅज्ड 17-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स, लाल ब्रेक कॅलिपर्स आणि ट्विन एक्झॉस्ट टिप्स, स्पोर्टी बंपर आणि मागील स्पॉयलर देखील आहेत. या सर्वांसह, व्हेन्यू एन-लाइन आता पूर्वीपेक्षा जास्त रॅली-रेडी दिसते.
‘या’ Scooter चा फॅन बेस एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही! आतापर्यंत विकले तब्बल 3.5 कोटी युनिट्स
केबिनच्या आतील भागात एक स्पोर्टी फील दिसून येतो. यात काळ्या आणि लाल थीम्ड इंटीरियर, एन-बॅज्ड लेदर सीट्स, मेटल पेडल्स आणि ॲम्बियंट लाइटिंगसह एन-लाइन स्टीअरिंग व्हील आहे, जे तुमचा प्रवास अधिक उत्तम करेल.
Venue N-Line मध्ये तोच दमदार 1.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिला आहे, जो 118 bhp ची पॉवर आणि 172 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. यात 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय दिला असून, 7-स्पीड DCT (Dual Clutch Transmission) ऑप्शन देखील उपलब्ध आहे. याशिवाय यात Paddle Shifters, Multi Drive Modes आणि Traction Control सारखी फीचर्स देण्यात आली आहेत, ज्यामुळे ड्रायव्हिंगचा आनंद अनेक पटींनी वाढतो. त्यात असलेल्या Twin Exhaust Setup मधून येणारा स्पोर्टी आवाज या SUV ला आणखी आकर्षक बनवते.
Hyundai ने या वेळेस Venue N-Line मध्ये सुरक्षेलाही जास्त प्राधान्य दिलं आहे. ही SUV आता Level-2 ADAS (21 functions सह) फीचरसोबत येते. त्यात Electronic Parking Brake with Auto Hold, TPMS (Tyre Pressure Monitoring System), 40+ स्टॅंडर्ड सेफ्टी फीचर्स, आणि मजबूत बॉडी स्ट्रक्चर देण्यात आले आहे. त्यामुळे ही SUV आता केवळ स्टायलिशच नाही, तर आणखी सुरक्षितही बनली आहे.