Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये नवीन Kia EV6 लाँच, मिळेल 650 किमीची रेंज

ऑटो एक्स्पो 2025 मध्ये अनेक ऑटो कंपन्या सहभागी झाल्या आहेत. तसेच या कार्यक्रमात अनेक उत्तम कार पाहायला मिळाल्या आहेत. आता किया मोटर्सने नवीन ईव्ही6 लाँच केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 19, 2025 | 07:52 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

किया इंडिया, भारतातील एक आघाडीची प्रीमियम कार उत्पादक कंपनीने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये नवीन किया ईव्ही६ लाँच केली आहे. या कार्यक्रमात कंपनीने नवीन इलेक्ट्रिक कारसाठी बुकिंग्जही सुरू केली. या लाँचमधून किया इंडियाने ब्रॅण्डच्या इलेक्ट्रिक वाहन प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.

नवीन ईव्ही६ सुरक्षिततेच्या बाबतीतही सातत्याने नवीन मापदंड स्थापीत करत आहे. ही कार एडीएएस २.० पॅकेजने सुसज्ज आहे, ज्यात २७ अत्याधुनिक सुरक्षितता आणि ड्रायव्हर सहाय्य सुविधा आहेत. यामध्ये फ्रंट कोलिजन्स अव्हॉयडन्स असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन अव्हॉयडन्स, इव्हेजिव स्टीअरिंग आणि लेन फॉलो असिस्ट अशा पाच नव्या सुविधांचा समावेश आहे. यापूर्वीच्या ईव्ही६च्या तुलनेत या सुविधांचा अधिक समावेश आणि सुधारणा करण्यात आली आहे. यामुळे वाहनांची संरचना अधिक मजबूत आणि सुरक्षित बनविण्यात आली आहे, आणि ड्रायव्हिंग अनुभव देखील अधिक आत्मविश्वासाने आणि सुरक्षिततेने भरलेला आहे.

Auto Expo 2025 मध्ये गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून दोन नवीन ई-स्कूटर्स आणि ई ऑटो लाँच

किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्वांगु ली म्हणाले, “वाहन उद्योगातील सकारात्मक बदलाला चालना देण्यासाठी किया इंडिया वचनबद्ध आहे. ईव्ही६ च्या आवृत्तीची लोकप्रियता वाढत आहे आणि ती जागतिक स्तरावर एक महत्त्वाचे इलेक्ट्रिक वाहन बनले आहे. नवीनतम हाय-टेक गोष्टींच्या माध्यमातून, आम्ही इलेक्ट्रिक वाहतुकीच्या मानकांना नव्याने व्याख्यायित करणार आहोत.”

ते पुढे म्हणाले, “भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये आमच्या सहभागातून आमची बांधिलकी दर्शवली आहे. या प्रदर्शनादरम्यान नवीन ईव्ही६चे अनावरण करणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. कार्बन मुक्तीच्या दिशेने केलेला हा एक महत्त्वाचा पाऊल आहे.”

ईव्ही६ चे डिझाइन

नवीन किया ईव्ही६ चे डिझाइन अधिक आकर्षक, शक्तिशाली आणि स्टायलिश आहे. कियाच्या ‘ऑपोझिट्स युनायडेट’ डिझाइन भाषेनुसार, या कारच्या पुढील भागात अधिक दणकट डिझाइन दिले आहे. तसेच, स्टार मॅप एलईडी रीअर कॉम्बिनेशन लॅम्प्स, कनेक्टेड डीआरएल्स, जीटी-लाइन स्टायलिंग बम्पर आणि १९ इंची मिश्रधातूंची चाके या सर्व सुविधांसह, नवीन ईव्ही६चा लूक आणखी धारदार आणि गतीशील बनवला आहे.

आता इंधनावर चालणाऱ्या कारला विसराच ! देशातील पहिली Solar Car लाँच, किंमत 4 लाखांपेक्षा कमी

रेंज आणि बॅटरी

अंदरच्या जागेमध्ये, ईव्ही६ अधिक आरामदायक आणि प्रगत आहे. हॅण्ड्स-ऑन डिटेक्शन तंत्रज्ञानासह डबल डी-कट स्टेअरिंग व्हील, आणि उच्च दर्जाची कॅबिन इंटीरियर्स ड्रायव्हिंगचा अनुभव नवीन उंचीवर नेतात. या वाहनात ८४-केडब्ल्यूएच शक्तिशाली बॅटरी आहे, जी ६५० किलोमीटरपर्यंतचा पल्ला देऊ शकते. याचबरोबर, ३२५ पीएस आणि ६०५ एनएम टॉर्कसह ही कार उत्कृष्ट ड्रायव्हिंग कामगिरी देते. ३५०-केडब्ल्यू क्षमतेचा जलद चार्जर केवळ १८ मिनिटांत १० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकतो.

अ‍ॅडव्हान्स कार

तंत्रज्ञानाच्या बाबतीत, ईव्ही६मध्ये १२.३ इंचाचा पॅनोरॅमिक कर्व्ड डिस्प्ले आणि कनेक्टेड कार नेव्हिगेशन कॉकपिट आहे. किया कनेक्ट २.० तंत्रज्ञानामुळे ओव्हर-द-एअर सॉफ्टवेअर अपडेट्स आणि डायग्नोस्टिक्सच्या सुविधाही उपलब्ध आहेत.

Web Title: New kia ev6 launched at bharat mobility global expo 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 07:52 PM

Topics:  

  • electric car
  • Kia Motors

संबंधित बातम्या

Kia India ची नवीन Battery as a Service योजना; भारतातील EV क्रांतीला मिळणार वेग!
1

Kia India ची नवीन Battery as a Service योजना; भारतातील EV क्रांतीला मिळणार वेग!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.