फोटो सौजन्य: Social Media
सध्या देशात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अनेक कार उत्पादक कंपन्या देशात अत्याधुनिक इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे. सततच्या इंधनातील दरवाढीमुळे कित्येक जण इलेक्ट्रिक कारला प्राधान्य देताना दिसत आहे. आता याही पुढे जात Vayve Mobility नावाच्या कंपनीने भारतातील पहिली सोलार एनर्जीवर चालणारी कार बनवली आहे.
भारत मोबिलिटी ग्लोअब्ल एक्स्पो 2025 मध्ये एकापेक्षाहून एक दर्जेदार कार पाहायला मिळाल्या आहेत. पण आता या कार्यक्रमात चक्क सोलार कार पाहायला मिळाली आहे. या कारचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
काय लूक आहे राव ! Auto Expo 2025 मध्ये BMW S 1000 RR आणि R 1300 GSA झाल्या लाँच
देशातील कार उद्योगात झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. एकीकडे, इलेक्ट्रिक कारमध्ये नावीन्य दिसून येत आहे. तर आता सौरऊर्जेवर चालणारी कार भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 कार्यक्रमात, पुणे येथील इलेक्ट्रिक वाहन स्टार्ट-अप कंपनी वायवे मोबिलिटीने देशातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार ‘Vayve Eva’ लाँच केली आहे. ३ मीटरपेक्षा कमी लांबीच्या या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत फक्त ३.२५ लाख रुपये, एक्स-शोरूम आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार एकदा चार्ज केल्यावर २५० किमी पर्यंतची रेंज देईल.
या सोलार कारची किंमत त्याच्या व्हेरियंटनुसार वेगळी असणार आहे. Vayve Eva तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे., ज्यांची नावं Nova, Stella, आणि Vega असे आहे. यातील नोव्हा व्हेरियंटची किंमत 3.25 लाख रुपये आहे. स्टेलाची किंमत 3.99 लाख रुपये आहे तर वेगाची किंमत 4.49 लाख रुपये असणार आहे.
या सोलर कारच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात दिलेला सोलर पॅनल कारच्या सनरूफच्या जागी वापरता येतो. यासह, या कारचा १ किमी चालण्याचा खर्च फक्त ८० पैसे आहे. कंपनीचा असा दावा आहे की ही देशातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक कार आहे. यात पुढच्या बाजूला एकच सीट आणि मागच्या बाजूला थोडी रुंद सीट आहे. ज्यावर एक मूल प्रौढांसोबत बसू शकते. या कारची ड्रायव्हिंग सीट ६ प्रकारे अॅडजेस्ट करता येते. याशिवाय कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात आला आहे. त्यात रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
खूप झाली CNG बाईकची हवा ; आता मार्केटमध्ये CNG Scooter मारणार एंट्री, Auto Expo 2025 मध्ये दिसली झलक
कारमध्ये अॅपल-अँड्रॉइड सिस्टम उपलब्ध असेल. यामध्ये एसीसह अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी सिस्टम आहे. त्याची लांबी ३०६० मिमी, रुंदी ११५० मिमी, उंची १५९० मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स १७० मिमी आहे. या कारच्या पुढच्या बाजूला स्वतंत्र कॉइल स्प्रिंग सस्पेंशन आणि मागील बाजूला ड्युअल शॉक सस्पेंशन आहे. यात पुढच्या चाकांमध्ये डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकांमध्ये ड्रम ब्रेक आहेत. इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंगने सुसज्ज असलेल्या या कारचा टर्निंग रेडियस ३.९ मीटर आहे. या रियर व्हील ड्राइव्ह कारचा टॉप स्पीड ७० किमी/तास आहे.
ही सोलार कार फक्त ५ सेकंदात ० ते ४० किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते. त्याच वेळी, ही पूर्ण चार्ज होण्यासाठी फक्त ४५ मिनिटे लागतील. त्यामुळे आता या कारला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार का याकडे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.