Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FASTag वापरताय? मग ‘ही’ बातमी वाचाच; नाहीतर मिनिटांत खात्यातून उडतील लाखो रुपये…

इंडियन सायबर क्राईम कोओर्डिनेशन सेंटर (14C) हा विभाग केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो. त्या विभागाने देखील या स्कॅमबाबत नागरिकांना सतर्क केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 23, 2026 | 05:24 PM
FASTag वापरताय? मग 'ही' बातमी वाचाच; नाहीतर मिनिटांत खात्यातून उडतील लाखो रुपये...

FASTag वापरताय? मग 'ही' बातमी वाचाच; नाहीतर मिनिटांत खात्यातून उडतील लाखो रुपये...

Follow Us
Follow Us:

अधिकृत ठिकाणीच फास्टटॅग काढावा 
अनोळखी लिंकवर क्लिक करू नये 
ओटीपी कोणासही शेअर करू नये

Fastag Scam: आजकाल सोशल मिडियाच्या माध्यमातून आपली सर्व कामे लवकर होतात. जग हे डिजिटल मिडियाच्या आधुनिकतेमुळे वेगाने पुढे चालले आहे. भारतात देखील डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन सुविधा मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. मात्र आता त्यातून अनेक प्रकारचे गुन्हे देखील होत असल्याचे (Automobile News) समोर येत आहे. असाच एक सायबर क्राइम ‘फास्टटॅग वार्षिक पास’ नावाने सुरू झाला आहे.

गुन्हेगारांनी आता लोकांना फसवण्यासाठी नवा शोध लावला आहे. त्यांनी अनेक फेक वेबसाइट्स तयार केल्या आहेत. या वेबसाइट्सचे डिझाइन आणि स्वरूप हुबेहूब सरकारी पोर्टलसारखेच ठेवण्यात आले आहे. एखादा सामान्य युजर या वेबसाइटला अधिकृत समजून त्यावर आपली माहिती भरतो आणि पैसे जमा करतो. मात्र, पैसे कापले जाऊनही युजरला कोणतीही खरी ‘फास्टॅग’ सेवा मिळत नाही. त्याबाबत एनएचआयने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सरकारी यंत्रणेने नागरिकांना केले सतर्क
इंडियन सायबर क्राईम कोओर्डिनेशन सेंटर (14C) हा विभाग केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो. त्या विभागाने देखील या स्कॅमबाबत नागरिकांना सतर्क केले आहे. सायबर गुन्हेगार इतके टायरीचे असतात की त्यांनी केलेली वेबसाइट आपल्याला पहिल्या नजरेतच खरी वाटते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

वाहनधारकांनो लक्ष द्या! महामार्गांवर FASTag स्कॅन नाही झाला तर आता बसणार दुप्पट दंड! केंद्र सरकारचा नवा नियम

कशी होते फसवणूक? 

खोटी पण हुबेहूब वेबसाइट: बनावट वेबसाइट्सचे यूआरएल (URL) सरकारी वेबसाइटशी मिळतेजुळते असतात. ज्यामुळे त्यातील फरक ओळखणे नागरिकांना अवघड जाते.

स्वस्त किंमतीची ऑफर: कमी किंमतीत फास्टॅग किंवा रिचार्ज देण्याचे आमिष दाखवून युजर्सना आकर्षित केले जाते आणि त्यांना लुटले जाते. यासोबतच युजर्सची वैयक्तिक माहिती आणि डेटा देखील चोरीला जात आहे.

FASTag News: उत्तरपासून दक्षिणेपर्यंत… नॅशनल हायवेवरील टोल दरात मोठी वाढ! १ एप्रिलपासून ‘या’ राज्यांत प्रवास महागणार

FASTag स्कॅन नाही झाला तर आता बसणार दुप्पट दंड

देशातील राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने टोल वसुलीचे नियम अधिक कडक केले आहेत. ‘राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2026’ मध्ये महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या असून, 17 मार्च 2026 पासून हे नवे नियम देशभरात लागू झाले आहेत. या नव्या नियमांमुळे आता टोल चुकवणे किंवा तांत्रिक कारणास्तव पेमेंट प्रलंबित ठेवणे वाहनधारकांना महागात पडणार आहे.

काय आहे नवीन ‘ई-नोटीस’ प्रणाली?

केंद्र सरकारने आता ‘ई-नोटीस’ (E-Notice) सिस्टीम कार्यान्वित केली आहे. जर एखादे वाहन टोल न भरता नाक्यावरून पुढे गेले किंवा तांत्रिक बिघाडामुळे पेमेंट पूर्ण झाले नाही, तर संबंधित वाहन मालकाला थेट डिजिटल नोटीस पाठवली जाईल. या नोटिसीमध्ये वाहनाचा तपशील, प्रवासाची वेळ आणि थकीत रकमेची संपूर्ण माहिती असेल. ही नोटीस एसएमएस (SMS), ईमेल किंवा अधिकृत मोबाईल ॲपद्वारे पाठवली जाणार आहे.

Web Title: Nhai alert users and people for fastag annual pass scam cyber crime automobile news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • automobile news
  • cyber crime
  • FASTag

संबंधित बातम्या

Buldhana News: दोन कोटींचा ‘डिजीटल गंडा’; २ आरोपी अटकेत सायबर पोलिसांची कारवाई, ज्येष्ठाची फसवणुक प्रकरण
1

Buldhana News: दोन कोटींचा ‘डिजीटल गंडा’; २ आरोपी अटकेत सायबर पोलिसांची कारवाई, ज्येष्ठाची फसवणुक प्रकरण

Hyryder CNG: 1 लाखात ‘ही’ कार घेतल्यास किती भरावे लागणार हफ्ते? EMI चा हिशेब एका क्लिकवर
2

Hyryder CNG: 1 लाखात ‘ही’ कार घेतल्यास किती भरावे लागणार हफ्ते? EMI चा हिशेब एका क्लिकवर

Mahindra Scorpio Lifestyler: मनावर राज्य करायला रस्त्यावर उतरली महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर, किंमत फक्त 19.79 लाख
3

Mahindra Scorpio Lifestyler: मनावर राज्य करायला रस्त्यावर उतरली महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर, किंमत फक्त 19.79 लाख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.