Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायबर चोरट्यांनी हद्दच पार केली! बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा गैरफायदा घेतला; वडिलांना व्हिडिओ कॉल केला अन्…

बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणाचा गैरफायदा घेत सायबर चोरट्यांनी तिच्या वडिलांकडून १५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 22, 2026 | 06:32 PM
सायबर चोरट्यांनी हद्दच पार केली! बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा गैरफायदा घेतला; वडिलांना व्हिडिओ कॉल केला अन्...

सायबर चोरट्यांनी हद्दच पार केली! बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा गैरफायदा घेतला; वडिलांना व्हिडिओ कॉल केला अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीच्या प्रकरणाचा गैरफायदा घेत सायबर चोरट्यांनी तिच्या वडिलांकडून १५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील कोंढवा पोलिसांनी अवघ्या १७ तासांत मुलीचा शोध घेत तिला झारखंडमधून सुखरूप ताब्यात घेतले. परंतु, या सायबर चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नव्हता. पोलिसांनी तांत्रिक तपासावरून त्या दोघांचा शोध सुरू केला आहे.

 

याप्रकरणी बनावट अपहरणाचा व्हिडिओ कॉल करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त गौहर हसन, पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गावडे व त्यांच्या पथकाने केली आहे.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी कोंढवा पोलिसांत अपहरणाची तक्रार दाखल केली होती. तक्रारदार हे मूळचे बिहार येथील असून, कुटुंबासह काकडे वस्ती कोंढवा येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या १७ वर्षीय मुलीला अज्ञाताने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय होता. तक्रार दाखल होताच कोंढवा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुलीचा शोध सुरू केला. याचदरम्यान मुलीच्या वडिलांना मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून व्हिडिओ कॉल आला. “तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे, अशी धमकी देत ५० हजार रुपयांची मागणी केली. तसेच, मोबाईलवर पैसे पाठविण्यासाठी स्कॅनरही पाठविला.

व्हिडिओ कॉलमध्ये मुलीचे हात-पाय बांधलेले असल्याचे दृश्य दाखविले होते. त्यामुळे घाबरलेल्या वडिलांनी ३ टप्प्यात प्रत्येकी ५ हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपये संबंधित खात्यावर पाठविले. दरम्यान पोलिसांनी सायबर चोरट्याला मुलगी सापडली असून, आज्जी जवळ असल्याचे पोलिसांनी सांगितले. नंतरही सायबर चोरटा त्यांच्याकडे बक्षिस म्हणून पैसे मागत होता. दरम्यान, टाटानगर येथे रेल्वे पोलिसांनी व रेल्वे कर्मचाऱ्यांनी मुलीचा शोध घेऊन तिला सुखरूप ताब्यात घेतले. नंतर कोंढवा पोलिसांचे पथक आणि मुलीचे वडिल झारखंडला रवाना झाले. मुलीला ताब्यात घेऊन तिची सुखरूप पालकांकडे सुपूर्द करण्यात आले.

हे सुद्धा वाचा : पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; तब्बल अडीच कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

व्हॉट्सअ‍ॅप पोस्टरचा सायबर चोरट्यांनी घेतला गैरफायदा

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध लागावा यासाठी वडिलांनी मुलीचा फोटो आणि माहिती असलेले पोस्टर तयार करून विविध व्हॉट्सअ‍ॅप समूहांवर प्रसारित केले होते. ही माहिती सायबर चोरट्यांच्या हाती लागली. त्याचाच गैरफायदा घेत त्यांनी बनावट अपहरणाचा व्हिडिओ तयार करून मुलगी त्यांच्या ताब्यात असल्याचे भासविले आणि भीती दाखवून १५ हजार रुपयांची खंडणी उकळली.

Web Title: Cyber criminals have extorted money from a resident of pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Fraud Case

संबंधित बातम्या

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?
1

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…
2

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त
3

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त

उच्चशिक्षित दुचाकी चोर जेरबंद, 150 CCTV तपासून वाकड पोलिसांची कारवाई; 8 लाखांच्या 11 दुचाकी जप्त
4

उच्चशिक्षित दुचाकी चोर जेरबंद, 150 CCTV तपासून वाकड पोलिसांची कारवाई; 8 लाखांच्या 11 दुचाकी जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.