फोटो सौजन्य: Pinterest
भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी MG Motors भारतात अनेक सेगमेंटमध्ये कार्स ऑफर करते. कंपनी इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये MG Windsor EV ऑफर करते. कंपनीने सांगितले आहे की ही कार 2025 मध्ये सर्वात जास्त मागणी असलेली कार ठरली. चला या कारच्या फीचर्स आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.
एमजी मोटर्स इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये विंडसर ईव्ही ऑफर करते. कंपनीने म्हटले आहे की ही कार 2025 मध्ये देशातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कार बनली आहे. एमजी मोटर इंडियाने चालू वर्ष 2024 च्या तुलनेत चालू वर्ष 2025 मध्ये विक्रीत 19% वार्षिक वाढ नोंदवली आहे, जानेवारी ते डिसेंबर 2025 दरम्यान 70554 युनिट्सची विक्री झाली आहे. याने गेल्या वर्षीच्या 100000 इलेक्ट्रिक कार विक्रीचा टप्पाही ओलांडला आहे. 2025 मध्ये या कारच्या 46735 पेक्षा जास्त युनिट्स विकल्या गेल्या. उत्पादकाने दिलेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये दरमहा सरासरी 4000 एमजी विंडसर विकल्या गेल्या.
MG Windsor EV मध्ये अनेक प्रीमियम आणि आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. या इलेक्ट्रिक कारमध्ये ड्युअल-टोन इंटीरियर, V2L आणि V2V टेक्नॉलॉजी, तसेच ॲम्बियंट लाइटिंग आणि इन्फिनिटी ग्लास रूफचा समावेश आहे. याशिवाय, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, 15.6 इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि वायरलेस स्मार्टफोन चार्जरही सुविधा मिळते.
‘या’ ऑटोमॅटिक कारसाठी फक्त 2 लाख रुपये भरा आणि थेट घरपोच डिलिव्हरी मिळवा! जाणून घ्या EMI चे गणित
ऑडिओसाठी कारमध्ये चार स्पीकर्स, चार ट्वीटर्स आणि सब-वूफर देण्यात आला आहे. तसेच वुडन फिनिश इंटीरियर, 604 लिटर क्षमतेचा मोठा बूट स्पेस, एलईडी हेडलाइट्स व टेललाइट्स, कनेक्टेड डीआरएल, पॉवर्ड टेलगेट, 18 इंचांचे अलॉय व्हील्स, ग्लास अँटेना आणि फ्लश डोअर हँडल्स यांसारखी आकर्षक फीचर्सही यात आहेत.
MG Windsor Pro EV मध्ये 52.9 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, ती एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 449 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. ही कार 60 kW डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने अवघ्या 50 मिनिटांत 20 ते 80 टक्के चार्ज होते. या इलेक्ट्रिक मोटरमधून 136 पीएस पॉवर आणि 200 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. तर Windsor EV च्या स्टँडर्ड व्हेरिएंटला सिंगल चार्जमध्ये 330 किलोमीटरची रेंज देण्यात आली आहे.
MG Windsor EV ची एक्स-शोरूम किंमत 14 लाख रुपयांपासून सुरू होऊन 18.39 लाख रुपयांपर्यंत जाते. याशिवाय, कंपनीकडून BaaS (Battery as a Service) पर्यायही देण्यात आला असून, या अंतर्गत या कारची किंमत 9.99 लाख रुपयांपासून 12.50 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे.






